श्रीरामपूरातील कायदासुव्यवस्थेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करा;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणेंचे गृहराज्यमंत्र्यांना साकडे

श्रीरामपूर-श्रीरामपूरच्या कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून नुकत्याच झालेल्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करुन तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करावे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूरच्या कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून नुकत्याच झालेल्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करुन तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी मुंबई  गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन केली आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर वेगळ्या वळणावर काही प्रवृत्ती नेऊ पाहत आहे त्यांचा तातडीने बंदोबस्त होणे आवश्यक आहे. जाणीवपूर्वक काही समाजकंटक जातीय सलोखा बिघडावयाच्या हेतूने प्रयत्न करत आहे. हे सगळं तातडीने रोखणं गरजेचं असून पोलीस प्रशासनाला कठोर भूमिका घेण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश होणे गरजेचे असल्याचे आ. ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हा सगळा प्रकार वेळीच रोखला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल काहींचा उद्देश फक्त आणि फक्त जाती – जाती मध्ये धर्मा – धर्मा मध्ये द्वेष पसरवून अशांतता निर्माण करणे हाच आहे. मात्र श्रीरामपूरची जनता सुज्ञ आहे. आशा कुठल्याही प्रकाराला बळी पडणार नसल्याचे देखील आ.ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी म्हटले आहे.याबाबत आपण लवकर राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची देखील भेट घेणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!