श्रीरामपूर पोलीसांकडून 27 मोबाईल मूळ मालकांना परत

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना डीवायएसपी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना डीवायएसपी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते परत देण्यात आले.दरम्यान या २७ मोबाईल मध्ये अनेक महागडे मोबाईल असून नागरिकांनी मोबाईल हाताळताना काळजी घ्यावी,जबाबदारीने मोबाईल हाताळावा.मोबाईल चोरी वा गहाळ झाल्यास आरोपी त्याचा गुन्हा करण्यासाठी गैरवापर करतो. त्यामुळे ही खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/सचिन दुकळे, पोकॉ/रामेश्वर तारडे, पोकॉ/रविंद्र शिंदे, पोकॉ/सागर बनसोडे, पोकॉ/अमोल गायकवाड यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!