श्रीरामपूर:
श्रीरामपूरच्या अस्मिता आणि स्वाभिमान जपल्यानेच स्व. जयंतराव ससाणे यांना मोठे काम करण्याची संधी मिळाली. कौटुंबिक कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आणि केवळ फक्त सहकारी आणि मित्रांच्या साथीने नगरसेवक पदापासून ते आमदार आणि साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पद अशा मोठ्या पदांवर स्वर्गीय ससाने साहेबांनी काम केले हे करत असताना त्यांनी कार्यकर्ता आणि नेता असा भेदभाव न करता समाजकारण आणि राजकारण केले. साहेब नेहमी सांगायचे की ही संघटना नसून आपले कुटुंब आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण आणि आपली संघटना कार्य करत राहिलं आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करू असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे यांनी म्हटले.
माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्ताने मा. आ.स्व.जयंतराव ससाने मित्र मंडळ, आ. हेमंत ओगले मित्र मंडळ आणि श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आझाद मैदान येथे गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले याप्रसंगी ससाने बोलत होते.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, आपण स्वतःला नशीबवान समजतो की आपल्याला स्वर्गीय ससाने साहेबांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली अनेक मोठ्या पदांवर काम करत असताना पाय मात्र जमिनीवर ठेवायचे. तळागाळातील जनतेला न्याय कसा देता येईल ही भूमिका त्यांची असायची त्यामुळेच अशा अटीतटीच्या लढतीत देखील विधानसभेवर आपले उमेदवार आ. हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू शकलो असल्याचे म्हटले.
डॉ . वंदनाताई मुरकुटे म्हणाले की, जनमानसात वावरणारा नेता म्हणून स्व. ससाणे साहेबांची ओळख होती. त्यांचे कार्य कायमचं अजरामर राहील असे प्रतिपादन त्यांनी केले.
बाबसाहेब दिघे यांनी आपल्या भाषणात स्व. ससाणे साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले.
यावेळी सूत्रसंचलन मुज्जफर शेख यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले यांनी मानले.
यावेळी बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे, अशोक थोरे,नगरसेवक मुजफ्फर शेख, अनिल ढोकचौळे, मास्टर सरवरअली, रितेश एडके, सुनील शिंनगारे त्यांच्यासह आदींचे भाषणे झाले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण,पंडितराव बोंबले, मा नगरसेवक रमण मुथा, दिलीप नागरे, राजन चूग, अशोक थोरे, राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, दत्तात्रय सानप, रितेश रोटे, मुन्नाभाई पठाण,भरत कुंकूलोळ, महंता यादव ,कलीम कुरेशी, के सी शेळके, अरुण मंडलिक, श्याम अडांगळे, दीपक चव्हाण, लकी शेठी, भारत भवार, तिलक डुंगरवाल, कॉम्रेड श्रीधर अधिक, अय्याज तांबोळी, संजय आगाशे, विलास लबडे, जावेद शेख, निखिल पवार, रजाक पठाण, रियाज पठाण, वैभव गिरमे, सुरेश निमसे, दत्तात्रय कुऱ्हे, संतोष परदेशी, रवी कळमकर, डॉ. राजेंद्र लोंढे, दीपक वमने, प्रवीण नवले, मुरली राऊत, प्रमोद वल्टे,गोरखनाना पवार, दत्ता पाटील कवाने, भारत बढे, विठ्ठलराव सोळुंके, बाळासाहेब खर्डे, प्रशांत उचित, विक्रांत धुमाळ, प्रसाद चौधरी, चांगदेव भागवत,डॉ. नितीन आसने, कैलास कणसे, सुनील शिरसाठ, रितेश चव्हाणके, अशोक जगधने,अमोल नाईक,दत्तात्रय बिबवे, विठ्ठलराव आसने, नितीन भुजबळ, चंद्रकांत वाघ, वैभव पंडित, द्वारकानाथ बडदे, रावसाहेब भगत, भागिनाथ शिरोळे, सुरेश भडांगे, सुदाम पटारे, सुभेदारभाई सय्यद, कुंडलिक खपके , सोमनाथ पाबळे, गणेश गायधने, संजय विधाटे, गोरखनाथ नान्नोर, शाकीर भाई शेख, प्रताप कवडे, बाबासाहेब पवार, संजय कोठारी,सरबजीतसिंग चुग, अतिश देसरडा, संजय जगताप, भानुदास पवार, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे, राजेंद्र बोरसे, सुरेश ठुबे, सुनील साबळे, रावसाहेब आल्हाट, मोहन रणवरे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत व सर्व सेवा सोसायटींचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेस व स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे शेकडो सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट:
हाऊस फुल गर्दी आणी तोच उत्साह…
कुणी कितीही त्रास दिला तरी आपण स्व.जयंतराव ससाणे यांच्या पुण्याईने तयार झालेल्या संघटनेच्या जोरावर येणाऱ्या सर्व निवडणुका बहुमताने जिंकू असा विश्वास सचिन गुजर यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर संघटनेतील पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.