श्रीरामपूर–
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनअंतर्गत बेलापूर पोलीस दूरक्षेत्र हद्दीत पोलिसांनी अनेक दुचाकींवर कारवाई केली. या कारवाई अंतर्गत पोलिसांनी वाहन चालकांकडून 15 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला.
बेलापूर बु. येथील झेंडा चौक परिसरात वाहनचालकांनी रस्त्यावर अस्तव्यस्त लावलेल्या, विना नंबर प्लेटच्या, फॅन्सी नंबर प्लेट तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट असलेल्या सुमारे २८ मोटारसायकलींवर कारवाई करत दंड वसूल केला.या कारवाईमुळे बेलापूर व परिसरातील वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली.कारवाईमुळे झेंडा चौक व बस स्टँड परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे, हेडकॉन्स्टेबल सचिन गायकवाड, कॉन्स्टेबल संपत बडे, कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे, कॉन्स्टेबल रवींद्र अभंग तसेच आरसीपीचे अमलदार यांनी केली.
पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या दुचांकीवर कारवाई करत २६ प्रकरणांमध्ये तब्बल १५,६०० रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईचे गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी कौतुक केले आहे.
