‘अशोक’च्या कामगारांच्या वेतन कपातीला विरोध-भोसले; कारखान्याच्या सद्यस्थितीवर चर्चेसाठी बैठकीचे आयोजन

श्रीरामपूर-अशोक कारखान्याचे व्यवस्थापन कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून कामगार संघटना व कारखाना व्यवस्थानात यासंदर्भात वाटाघाटी चालू...

श्रीरामपूर-
अशोक कारखान्याचे व्यवस्थापन कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून कामगार संघटना व कारखाना व्यवस्थानात यासंदर्भात वाटाघाटी चालू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.त्यात पुढे म्हटले की,अतिशय काटकसर व पारदर्शक व्यवहाराचा डांगोरा पिटणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाने नको ते उद्योग करून कारखाना आर्थिक अडचणीत आणला आहे. सुमारे साडेसहा लाख टन गाळप करणाऱ्या ‘अशोक’ ला २०२५-२६ च्या हंगामात केवळ तीन लाख नव्वद हजार टन गाळप करून हंगाम आटोपता घ्यावा लागला. सातत्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी मिळत असलेल्या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अशोक कडे पाठ फिरवल्याने गाळप हंगाम अडचणीत येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानाना व्यवस्थापनाला सूचित केले होते. परंतु नेतृत्वाने सभासदांच्या मागणीकडे डोळेझाक केल्याने तसेच  डिस्टिलरी व इथेनाॕल प्रकल्पांची क्षमता वाढ व इन्सनीरेशन बॉयलर या सारख्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रकल्पामुळे दरवर्षी कारखान्याला सुमारे ५० कोटी रुपये व्याजाचे भुर्दंड बसत आहे.ज्या कामगारांना कार्यकर्ता म्हणून कार्यक्षेत्राच्या चाळीस गावात मिरविले,आज त्याच कामगारांवर  वेतन कपातीच्या निर्णयास सामोरे जाण्याची वेळ यावी या सारखे दुर्भाग्य नाही. अशोक कारखान्याच्या व्यवस्थापनापुळे कारखाना आर्थिक दिवाळखोरीत आला आहे.आज जे आर्थिक  संकट उभे राहिले ते नको ते उद्योग आणि गैरव्यवहार यामुळे आहे,यात कामगारांचा काय दोष?असा सवाल करत कामगारांच्या पगार कपातीच्या निर्णयास सभासदांचा विरोध असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.अशोक कारखान्याचे बहुतांश कामगार हे सभासद किंवा सभासदांची मुले आहेत.त्यामुळे त्यांना कुणीही वेठबिगार समजू नये.कारखान्याच्या पैशातून शिक्षण संस्थांना आर्थिक रसद पुरवली जाते.कारखाना अडचणीत आहे तरी गाड्याघोड्या उडविल्या जातात,अशी वस्तुस्थिती असल्याने चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालकांनी कारखाना वाहने वापरु नयेत,भत्ते घेवू नये, गेस्ट हाऊस बंद करुन काटकसर करावी परंतु विनाकारण कामगारांवर अन्याय करु नये.वेतन कपातीचा निर्णय घेतल्यास व्यवस्थापनाला सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.

गेल्या ५-६ वर्षांतील गाळप हंगामामध्ये साधारण ३५-३७ लाख टन ऊसाचे गाळप होऊनही अशोक सहकारी कारखान्याचा संचित तोट्यात वाढ होऊन तोटा मागील अहवालानुसार साधारण ५० कोटी पर्यंत वाढलेला आहे.तो या वर्षीच्या अहवालात आणखी वाढण्याची शक्यता आहे.कामगारांचे गेला ८-९ महिन्यांपासून पगार नाहीत,ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट थकलेले आहे या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकरी व सभासद तसेच आजी माजी कामगार व अशोक सहकारी साखर कारखान्यावर प्रेम करणार्‍या नागरीकांनी शहरातील विश्रामगृहावर २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली असून त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!