श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील मेन रोडवरील श्रीराम मंदिर चौकामध्ये शनिवार दि.28 रोजी रात्री बेलापूर येथील एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला.मानेवर चाकूने करण्यात आलेल्या या हल्ल्यात सदर तरुण गंभीर जखमी झाला असल्याने त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.श्रीरामपूर शहरात सध्या रामनवमी उत्सव सुरू असून गेल्या चार दिवसात अशा प्रकारे हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील नागरिक दहशतिच्या सावटाखाली वावरत आहेत.
दरम्यान तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर लगेचच श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे पोलीसांचा फौजफाटा घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.सदर जखमी तरुणाला प्रथम येथील साखर कामगार रुग्णालय उपचरांसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला नगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.हल्ल्यातील जखमी तरुणाचे नाव राशीनकर रा.बेलापूर असे असल्याचे समजले.या तरुणावर कोणत्या कारणातून हा चाकू हल्ला करण्यात आला हे पोलीस तपासातूनच पुढे येईल.
