श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदान परिसरात उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या स्विप्ट कारने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहनाचे नुकसान झाले आहे. मात्र वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले हे आपले कर्तव्य बजावण्यासाठी आले होते. त्यांनी आपली गाडी मैदानापासून काही अंतरावर उभी केली होती. मात्र, काही वेळातच वाहनात तांत्रिक बिघाड होऊन गाडीने अचानक प्रशासन पेट घेतला यावेळी तिथे यात्रेत आलेले प्रकार भाऊसाहेब जाधव यांनी त्वरित नगरपालिका अग्निशामक विभाग नगराध्यक्ष करण ससाने यांना संपर्क करून माहिती दिली स्थानिक नागरिक, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे ही आग वेळीच विझवण्यात आली.यावेळी पत्रकार भाऊसाहेब जाधव यांनी तिथे असलेले गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार व इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संघर्ष दिघे, खंडु गागुर्डे त्यांच्या मित्रमंडळाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यास मदत केली. घटनेनंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन करत मदत करणाऱ्या सर्व युवकांचे व नागरिकांचे आभार मानले.
उत्सवाच्या दरम्यान, पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक लक्ष देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
