अभयकुमार तेलतुंबडे यांना ‘बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार’;126 वेळा केले रक्तदान

श्रीरामपूर-मुठेवाडगाव येथील प्रसिद्ध समाजसेवक व रक्तमित्र अभयकुमार विजय तेलतुंबडे यांना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील दुधीनगर येथे दि. 15 मार्च रोजी आयोजित...

श्रीरामपूर-
मुठेवाडगाव येथील प्रसिद्ध समाजसेवक व रक्तमित्र अभयकुमार विजय तेलतुंबडे यांना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील दुधीनगर येथे दि. 15 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात प्रगती फाउंडेशन तर्फे ‘बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात देश-विदेशातून आलेल्या दोनशेहून अधिक रक्तदाते व समाजसेवकांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
समाजकार्यातील सातत्यपूर्ण योगदानामुळे अभय तेलतुंबडे यांना यापूर्वीही विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोटा नॅशनल प्राईड 2022सह पंजाबमधील भटिंडा, बिहारमधील दरभंगा व गया, तेलंगणातील हैदराबाद तसेच राजस्थानमधील भीमनाल येथेही त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.अभय तेलतुंबडे यांनी आतापर्यंत 126 वेळा रक्तदान केले असून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. साईसेवा व मुठेवाडगाव रक्तदान परिवार यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात नवसंजीवनी निर्माण केली आहे. तरुणांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याबरोबरच थॅलेसेमिया व सिकलसेल निर्मूलनाबाबत जनजागृती, तसेच अवयवदान व देहदानाबाबतही ते सातत्याने प्रचार-प्रसार करत आहेत.
कोरोना काळात त्यांनी राज्यभर विविध प्रकारे मदतकार्य केले होते. त्या योगदानाबद्दल शासनाकडून त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. देशभरातील अनेक संस्थांनी त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
सध्या अभय तेलतुंबडे हे सोशल अॅक्टिव्हिस्ट वेलफेअर असोसिएशन, भारत (नवी दिल्ली), सोनल फाउंडेशन आणि अरिहंताण रक्तसारथी संस्थान या संस्थांचे राज्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास नेपाळचे दीपक प्रसाद उपाध्याय, माजी आमदार हरिराम चौरो, कमलेश मोहन, भुवनेश्वर (ओडिशा) येथील क्राईम इन्व्हेस्टिगेटर संजुक्ता आचार्य, अॅड. शंकर, डॉ. दिनेश आचार्य, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक अग्रहरी तसेच रणजित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अभय तेलतुंबडे यांना मोमेंटो, शाल, प्रशस्तिपत्र आणि फीत देऊन गौरविण्यात आले.
अभय तेलतुंबडे यांच्या या यशाबद्दल परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून विविध मान्यवर, पदाधिकारी आणि रक्तदान परिवारातील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!