श्रीरामपूर तहसीलदारांचा अवैध वाळूतस्करांना दणका;मातूलठाण येथे ट्रॅक्टर जप्त; भरारी पथकाची कारवाई

श्रीरामपूर–तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध महसूल विभागाने आपली आक्रमक मोहीम सुरूच ठेवली असून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या आदेशानुसार, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या...

श्रीरामपूर
तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध महसूल विभागाने आपली आक्रमक मोहीम सुरूच ठेवली असून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या आदेशानुसार, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मातुलठाण येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर भरारी पथकाने रंगेहाथ पकडला असून, वाळू माफियांमध्ये या ‘धुरंधर’ कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, महसूल विभागाच्या पथकाने मौजे मातुलठाण येथील गोदावरी नदी पात्रात सापळा रचला होता. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १७ सी.एक्स. ७६१२  हा अनधिकृतरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पथकाने तातडीने झडप घालत हा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. सदर वाहन सध्या श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले असून सहा. महसूल अधिकारी अशोक नरोड यांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.या धडक कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप चव्हाण, तुषार आगळे, सुरेंद्र पवार, राहुल साठे, गोविंद खैरनार यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या धडाकेबाज कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा कडक इशारा…
“गोदावरी नदी पात्रातून अनधिकृत वाळू उपसा किंवा वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मातुलठाण येथील कारवाई ही केवळ सुरुवात असून, यापुढेही तालुक्यातील अशा अवैध धंद्यांवर महसूलचे पथक करडी नजर ठेवून असेल. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!