माळवाडगाव परिसरात अवकाळीसह गारपीट;गहू, मका व कांदा पिकांचे मोठे नुकसान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव परिसरात काल दि.१९ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस, जोरदार वादळी वारा आणि मोठ्या प्रमाणात...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव परिसरात काल दि.१९ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस, जोरदार वादळी वारा आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका गहू, मका आणि कांदा पिकांना बसला असून अनेक शेतांमधील पिके अक्षरशः आडवी झाली आहेत.
माळवाडगाव व आसपासच्या परिसरात दुपारच्या सुमारास हवामान अचानक बदलले. काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार मारा सुरू झाला. अवघ्या काही मिनिटांत शेतातील उभे पीक गारांनी झोडपून काढले. यामुळे आधीच काढणीच्या उंबरठ्यावर असलेले गहू, मका आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ पिकेच नाही तर शेतीसाठी बसविण्यात आलेल्या सोलर पंपांचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोलर पॅनल फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी चिंतेत असून अनेकांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे माळवाडगाव परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

श्रीरामपूर पोलीसांकडून 27 मोबाईल मूळ मालकांना परत

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना डीवायएसपी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते

Latest News

Trending News

error: Content is protected !!