टिळकनगर व एकलहरे परिसराल गारपिटीचा तडाखा;शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

श्रीरामपूर-तालुक्यातील टिळकनगर सह एकलहरे परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर...

श्रीरामपूर-
तालुक्यातील टिळकनगर सह एकलहरे परिसरात  रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले उत्पादन अक्षरशः नष्ट झाले आहे. यामुळे आर्थिक संकट अधिक तीव्र झाले असून तातडीच्या उपाययोजना आणि सरकारी मदतीची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कांदा, गहू आणि इतर पिकांना याचा मोठा फटका बसला असून, तात्काळ परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार शेख, ज्येष्ठ पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सरपंच पती अनिस शेख, माजी उपसरपंच रमेश कोल्हे, विलास ठोंबरे, संजय अग्रवाल,  सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच अनुसया इंगळे, ग्रामपंचायत सदस्या नसिमखातून जहागीरदार, रावण निकम,निर्मला झिने,  कोकिळा अग्रवाल, रामदास झिने सह शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

श्रीरामपूर पोलीसांकडून 27 मोबाईल मूळ मालकांना परत

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना डीवायएसपी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते

Latest News

Trending News

error: Content is protected !!