आ.वडेट्टीवारांचा बोलवता धनी कोण?-बांद्रे यांचा सवाल;आकारी पडीत जमिन वाटपाचा वाद शिगेला

श्रीरामपूर-महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या हरेगाव मळा यांच्याकडील आकारी पडीत जमिनी बाबत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उन्हाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी...

श्रीरामपूर-
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या हरेगाव मळा यांच्याकडील आकारी पडीत जमिनी बाबत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उन्हाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब बांद्रे यांनी चांगलाच आक्षेप घेत आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
आकारिपडीत जमीन बाबत सन 2012 पासून सुरू असलेल्या केस संदर्भाने काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना हरेगाव शेती महामंडळाच्या बाबत व आकारी पडीत जमीन मालकांच्या प्रश्नाबाबत किती माहिती आहे, त्यांना खोटी माहिती पुरवणारे कोण आहेत आणि त्यांचे बोलावते धनी कोण आहे? असे प्रश्न बांद्रे यांनी उपस्थित केले आहेत.
ते पुढे म्हणाले की, आकारी पडीत जमीन मालकांच्या जमिनी त्यांना परत करण्यासंदर्भात सन 2012 पासून छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात महायुती सरकारमधील अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असणारे आणि काँग्रेस पक्षाचे माजी महसूल मंत्री यांनी आकारी पडित जमिनी या शासनाने संपादित केलेल्या आहेत आणि त्या जमिनी शेतकऱ्यांना परत देता येणार नाही असे स्पष्ट शब्दात माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. आणि आकारिपडीत जमीन वाटप प्रक्रियेला खो घालून ठेवलेला आहे.त्यांच्याच पक्षाचे म्हणजेच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार विद्यमान सरकारमधील मंत्र्यांवर खोटे आरोप करत आहेत.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की हरेगाव शेती महामंडळाकडे असलेली जमीन ही एक एकर जमीन एक कोटी रुपये किमतीची जमीन आहे. तर मग आपल्याच पक्षाच्या तत्कालीन महसूल मंत्री महोदयांनी ही जमीन त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना साधारण एकरी सात ते दहा हजार रुपये प्रति वर्ष याप्रमाणे नाममात्र मोबदला घेऊन एवढ्या मोठ्या किमतीची जमीन कशी दिली? त्याबाबत देखील त्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे. हा प्रकार म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ असाच होणार नाही का?
आकारिपडीत जमीन मालकांनी ज्यावेळेस शेती महामंडळाकडे असलेल्या आकारी पडित जमिनी कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर देण्याचे टेंडर निघाले त्यावेळेस आकारी पडीत जमीन मालकांचे वकील एडवोकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या जमिनी आमच्या वडिलोपार्जित आहेत व आमच्या केसचा निकाल लागेपर्यंत त्या जमिनी आकारी पडीत जमीन वारसांना प्रतिवर्ष प्रती एकर हजार रुपये पेक्षा जास्त किमतीत आम्ही घेण्यास तयार आहोत, म्हणून साधारण 400 ते 500 शेतकऱ्यांनी मागणी केलेले असताना देखील त्या जमिनी त्या शेतकऱ्यांना न देता तत्कालीन सरकारचे व काँग्रेस पक्षाचे महायुती सरकारच्या महसूल मंत्री यांनी नाममात्र रक्कम आपल्या जवळच्या लोकांनाच का दिल्या, याचा देखील खुलासा आमदार विजय वडेट्टीवार यांनी करावा.हरेगाव शेती महामंडळाकडील चार हजार एकर जमीन एमआयडीसीला देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या चालू असलेल्या हालचाली बाबत बोलताना भाऊसाहेब बांद्रे यांनी महाराष्ट्र शासन घेत असलेल्या एमआयडीसीसाठी जमीन संपादनाबद्दलचा निर्णय हा स्वागतार्यच आहे. कारण श्रीरामपूर तालुक्यात असलेले दोन खाजगी साखर कारखाने बेलापूर शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड हरेगाव आणि टिळक नगर शुगर मिल्स टिळक नगर हे दोन साखर कारखाने बंद पाडण्यात आले. मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को-ऑपरेटिव सोसायटी ही संस्था ज्या संस्थेत साधारण 4000 ते 5000 कर्मचारी काम करत होते, ती संस्था बंद पाडण्यात आली. श्रीरामपूर सूतगिरणी बंद करण्यात आली. श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे मोठे उद्योग किंवा उद्योजक येऊ शकले नाही. त्यामुळे एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकत नाही. श्रीरामपूर तालुक्यात बेरोजगारी संपविण्यासाठी यातील जमीन द्यावी फक्त एकच विनंती एमआयडीसीसाठी जमीन संपादन करण्याअगोदर आकारी पडित जमीन आकारी पडीत जमीन मालकांच्या वारसांना वाटप करण्यात याव्यात व नंतर उरलेल्या सर्व जमिनी सरकारने एमआयडीसीसाठी द्याव्यात असेही शेवटी भाऊसाहेब बांद्रे यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!