नगरसेवक अर्जुन दाभाडेंचे नाव निलेश शेंडगे हत्या प्रकरणातून वगळा; श्रीरामपुरमध्ये समर्थकांची पोलिसांकडे मागणी

श्रीरामपूर- नायगाव येथे घडलेल्या निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणातश्रीरामपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांना राजकीय द्वेषातून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप...

श्रीरामपूर-  
नायगाव येथे घडलेल्या निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणातश्रीरामपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांना राजकीय द्वेषातून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करत आज त्यांच्या हजारो समर्थकांनी शहरातून मोर्चा काढत या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे  तपास करावा व अर्जुन दाभाडे यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळावे अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या.
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी नायगाव येथे निलेश शेंडगे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात नगरसेवक अर्जुन दाभाडे यांच्यासह इतर काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय वैमनस्य असून दाभाडे यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
आज काढण्यात आलेल्या या मोर्चात शहरातील विविध भागांतील शेकडो महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “अन्याय सहन करणार नाही”, “दाभाडेंना न्याय द्या”, “खोटे गुन्हे मागे घ्या” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ आणि पोलीस उपनिरीक्षक राम शिखरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. या निवेदनामध्ये निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने व्हावा, खऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, मात्र केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन अर्जुन दाभाडे यांच्यावर लादलेले खोटे आरोप व गुन्ह्यातील त्यांचे नाव तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी केली आहे. तसेच, मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास पुढील काळात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समर्थकांकडून देण्यात आला.
या मोर्चात राज चव्हाण, धनश्री दाभाडे, संचिता नरोटे, आरती धुमाळ, सोनाली ठमके, अरुणा ठमके, समीक्षा कांबळे, माया रिल, बाळासाहेब गाडेकर, हनिफ पठाण, वसला पवार, विठ्ठाबाई रननवरे, सोनू वेरागर यांच्यासह शहर व परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!