प्राईड अकॅडमीमधून सर्वोत्तम विद्यार्थी घडतील-स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज

श्रीरामपूर-प्राईड अकॅडमीमध्ये अध्यात्मिक, संस्कारक्षम व दर्जेदार आधुनिक शिक्षण मिळत असल्यामुळे येथे जगातील सर्वोत्तम विद्यार्थी घडतील असे उद्गार देवगडचे स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज...

श्रीरामपूर-
प्राईड अकॅडमीमध्ये अध्यात्मिक, संस्कारक्षम व दर्जेदार आधुनिक शिक्षण मिळत असल्यामुळे येथे जगातील सर्वोत्तम विद्यार्थी घडतील असे उद्गार देवगडचे स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांनी काढले. माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे व मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या टाकळीभान येथील प्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून टाकळीभान सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात, अशोकचे माजी व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, सरपंच अर्चनाताई रणनवरे,दिलावर पठाण, भोकर सोसा. चेअरमन कारभारी तागड, भारत भवार
शांताराम तुवर, विराज भोसले, राजेंद्र कोकणे,अर्जुन राऊत, प्रकाश जाधव , रामकृष्ण गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्वामी बोलताना पुढे म्हणाले की येथील शिक्षणाद्वारे देशाची संस्कृती, राष्ट्रसेवा जपण्याचे काम होत असून विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, संस्कृत सह विविध भाषा याचे ज्ञान दिले जाते त्यामुळे येथील विद्यार्थी जगाच्या पाठीवर चमकतील असे उद्गार महाराजांनी काढले. प्रस्ताविक करताना प्राईड अकॅडमीच्या संचालिका मा.सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणल्या की  समाज बांधणीसाठी भविष्यात चांगली पिढी घडेल यासाठी शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड देऊन येथे शिक्षण दिले जात असून क्रीडा व संस्कृतिक गुणांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपली उत्कृष्ट कला सादर करून उपस्थित यांची मने जिंकली. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वांचे आभार माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी एकनाथ पटारे, विलास दाभाडे,प्रताप पटारे, केरूबापू मगर,सुदामराव पटारे, ,योगेश उंडे,राहुल बनकर,आबासाहेब ढूस, मोहन रणनवरे, बाळासाहेब कोकणे, बाबुराव तागड, राहुल अभंग , अशोक गायकवाड , मोहन रणनवरे , भैय्या पठाण आदीसह मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!