अवैध गुंतवणूक रॅकेटचा पर्दाफाश; ‘ग्रो इन्व्हेस्टर’वर अखेर गुन्हा दाखल;गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

श्रीरामपूर-शेअर बाजारात गुंतवणूक करून नागरिकांनाप्रचंड परताव्याचे आमिष दाखवूत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या भोकर परिसरात सुरू असलेल्या अवैध गुंतवणूक रॅकेटचा श्रीरामपूर तालुका...

श्रीरामपूर-
शेअर बाजारात गुंतवणूक करून नागरिकांना
प्रचंड परताव्याचे आमिष दाखवूत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या भोकर परिसरात सुरू असलेल्या अवैध गुंतवणूक रॅकेटचा श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाची बनावट फर्म स्थापन करून कोणताही परवाना नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भान्यासं 2023 कलम 318(4),3(5) अन्वये दोघां विरोधात जास्त परताव्याचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीपराज मोहिनीबाई कपाटे (वय ३७) व अमोघ संदीपराज कपाटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
भोकर शिवारातील हनुमानवाडी, नेवासा रोडवरील श्रीदत्तप्रभु सेवाश्रम परिसरात ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण काशिनाथ धनवडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने २६ डिसेंबर रोजी छापा टाकला.छाप्यात संदीपराज मोहिनीबाई कपाटे (वय ३७) यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, नऊ पासबुक, दहा चेकबुक, रोख १ लाख ४ हजार ६०० रुपये, संगणक, लॅपटॉप, डायऱ्या, कॅश काऊंटिंग मशीन, वॉकी-टॉकी, स्कॅनर, पेनड्राईव्ह तसेच दोन बंद अवस्थेतील तिजोऱ्या असा सुमारे १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, डिजिटल लॉक असलेल्या तिजोऱ्या व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे पासवर्ड न मिळाल्याने त्यातील माहिती अद्याप तपासता आलेली नाही.

चौकशीत संदीपराज कपाटे व अमोघ संदीपराज कपाटे यांनी संगनमत करून ‘ग्रो इन्व्हेस्टर’ या नावाने फर्म सुरू केल्याची कबुली दिली. प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करता लोकांकडून रोख व ऑनलाईन स्वरूपात मोठ्या रकमा स्वीकारून ६० दिवसांत ३५ ते ८२ टक्के परताव्याचे आमिष दाखवण्यात येत होते. सुरुवातीला वेळेवर परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील पहिल्या साक्षीदाराने १२.५० लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले असून, नंतर परताव्याऐवजी वाहन देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांच्या मोबाईलमधील माहितीच्या आधारे अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या कोणतीही थेट तक्रार पुढे आलेली नसली, तरी भविष्यात या फसव्या योजनेची व्याप्ती वाढून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अमोघ कपाटे अद्याप चौकशीस हजर न झाल्याने तपासात अडथळे येत असून, बँक खाती, डिजिटल व्यवहार आणि जप्त साहित्याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!