दहशतवादी संघटनेशी बंटी जहागिरीदारचे संबंध-जिल्हाध्यक्ष दिनकर यांचा आरोप;पालकमंत्री विखे पाटील यांच्यावरील टीकेचा व्यक्त केला निषेध

श्रीरामपूर-काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरात गोळीबारामध्ये मृत्यू झालेला बंटी जहागीरदार हा जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बाॅम्बस्फोटात आरोपी होता. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे...

श्रीरामपूर-
काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरात गोळीबारामध्ये मृत्यू झालेला बंटी जहागीरदार हा जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बाॅम्बस्फोटात आरोपी होता. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही भाजपच्या वतीने समर्थन करत असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व उपाध्यक्ष दीपक पटारे यांनी स्पष्ट केले.आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी बंटी जहागिरीदार हा संबंधित होता असाही आरोप दिनकर यांनी केला.
नुकतीच बंटी जहागिरदार याच्या भावाने
पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती.त्यास भाजपकडून उत्तर देत पालकमंत्री यांच्यावर टीका करणे ही निंदनीय बाब असून त्याचा आम्ही निषेध करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील लक्ष्मीनारायण हाॅटेलमध्ये भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरसेवक संजय गांगड, आशिष धनवटे दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, अर्जुन दाभाडे, रवी पाटील आदी उपस्थित होते.
दिनकर व पटारे यांनी मंत्री विखे यांनी शिर्डी येथे गुन्हेगारासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना सांगितले की,जिल्हातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याबाबत पालकमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. त्यांना जिल्ह्यात शांतता हवी आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत.
गुन्हेगाराला जात धर्म नसतो.त्याचे कोणीही समर्थन करणार नाही.भाजप कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही.पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूरसह जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्याचा मानस व्यक्त केला असून तशा सूचनाही पोलिसांना दिलेल्या आहे.मात्र काही जण त्याचे राजकारण करीत आहेत.भाजप कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!