श्रीरामपूरचा पाणीपुरवठा पुर्ववत होणार;सात तारखेपासून भंडारदरा धरणातून आवर्तन

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरासाठी तयार होणाऱ्या नवीन साठवण तलावाचे काम चालू असल्याने व पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या तलावातील साठवलेले पाणी पाटबंधारे खात्याचे रोटेशन...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरासाठी तयार होणाऱ्या नवीन साठवण तलावाचे काम चालू असल्याने व पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या तलावातील साठवलेले पाणी पाटबंधारे खात्याचे रोटेशन येईपर्यंत पुरविणे गरजेचे असल्याने पंधरा दिवसापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.सात तारखेला भंडारदर्‍यातून पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. सदरचे पाणी नऊ तारखेपर्यंत श्रीरामपुरात येईल.त्यामुळे दहा तारखेपासून शहरवासीयांचा दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन सात तारखेला पिण्याचे पाण्याचे रोटेशन सोडण्याचे आदेश केले.सदरचे रोटेशन महिनाभर चालणार असल्याने तोपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल.त्यानंतर पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे.
नगरपालिका प्रशासनाने कॅनलचे लांबलेले रोटेशन पाहता आहे ते पाणी महिनाभर शहरवासीयांना पुरावे यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर नगराध्यक्ष करण ससाणे व आमदार हेमंत ओगले यांनी तातडीने तलावाची पाहणी करून पाटबंधारे खात्याशी संपर्क केला व पाणी रोटेशन लवकर सोडण्याबाबत विनंती केली.शहरात अनेकांना अभूतपूर्व अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही पाणीटंचाई पाहून नागरिकांना ४० वर्षांपूर्वीचे दिवस आठवत आहेत.
साठवण तलावाचे बांधकाम सुरू असताना पालिका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई भासू नये म्हणून साठवण तलावाच्या मध्ये भिंत घालून तलावाचे दोन भाग करून एका भागात पाणी साठवले होते.परंतु अचानकपणे हा भराव वाहून गेल्याने तलाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले त्यानंतर तो भरावच काढून टाकला. त्यामुळे पाणीसाठा करणे शक्य झालेले नाही.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन देखील जुन्या झाल्या आहेत. त्या वारंवार लिकेज होतात तसेच वीज टंचाईमुळे शहरातील अनेक भागातील लोक त्रस्त असून त्यामुळे देखील पाणीटंचाई निर्माण होते.कारण ज्यावेळी पाणी सुटते त्याचवेळी लाईट गेलेली असते तर काही वेळा लाईट असते मात्र पुरेसे होल्टेज नसल्याने पाणी वर टाकीमध्ये जातच नाही अशा अनेक समस्या सध्या आहेत.नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन श्रीरामपूरची पाणीपुरवठा स्थिती समजून घेतली आहे. त्या दृष्टीने आता पावले उचलली जात असून भविष्य काळामध्ये शहरवासीयांना पाणीटंचाई भासणार नाही याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देत आहे.

शहरातील पाणी पुरवठा तलावाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!