श्रीरामपूर (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ श्रीरामपूर आणि इनरव्हील क्लब ऑफ श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केशव गोविंद बन येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एक संगणक (कॉम्प्युटर) प्रदान करण्यात आला.
तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल शिक्षणाची गरज ओळखून हा उपक‘म राबविण्यात आला. या संगणकामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेचे धडे मिळतील, तसेच त्यांचे शिकणे अधिक प्रभावी आणि आनंददायी होईल, असा विश्वास शाळेच्या मु‘याध्यापकांनी व्यक्त केला.
या प्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष्य डॉ. अजित घोगरे, डायरेक्टर उल्हास जी धुमाळ, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. शितल घोगरे, सदस्या कांचन शिरसाठ, सरपंच प्रणाली भगत, शाळा समिती अध्यक्ष विलास भगत, ज्ञानदेवराव गायकवाड, बी. एम. पुजारी, अदिती गायकवाड ,प्रतीक्षा गायकवाड ,शाळेचे शिक्षकवर्ग, मु‘याध्यापक कदम सर, जठाड सर, सय्यद सर, खरात सर, जाधव मॅडम, कोळपकर मॅडम, शुभांगी भगत मॅडम.पालक आणि विद्यार्थी मोठ्या सं‘येने उपस्थित होते. या उपक‘माबद्दल शाळेच्या वतीने क्लबच्या पदाधिकार्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
हा संगणक शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.