श्रीरामपूरसाठी ५ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकासकामांना मान्यता;पालकमंत्री विखे पाटील यांचे विशेष प्रयत्न

श्रीरामपूर–श्रीरामपूर शहराच्या विविध विकास कामांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने सुमारे ५ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांना...

श्रीरामपूर
श्रीरामपूर शहराच्या विविध विकास कामांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने सुमारे ५ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री ना.विखे पाटील यांच्या विशेष निधीतून शहरातील नेवासा-संगमनेर रस्त्या करिता २ कोटी रुपये रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक आशिष धनवटे व भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी दिली.
श्रीरामपूर शहरातील विविध विकास कामांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या होता.त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून नामदार विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे.त्यामध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत २४ कामांचा समावेश असून त्याकरिता २ कोटी ७१ लक्ष रुपये तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर)अंतर्गत २५ कामांसाठी २ कोटी ८७ लक्ष ९९ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या ५ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या निधीतून शहरातील विविध भागांमधील भूमिगत गटारी, रस्त्यांचे मजबुतीकरण, काँक्रिटीकरण व डांबरीकरणाची विकास कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा नेवासा संगमनेर  रस्ता अतिशय खराब झालेला आहे.या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पालकमंत्री ना.विखे पाटील यांच्या विशेष निधीतून सुमारे  २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील विविध विकास कामांसाठी पालकमंत्री ना.विखे पाटील यांच्या माध्यमातून आत्ता पर्यंत मोठ्या प्रमाणात विकास निधी शहराच्या विकासासाठी मिळालेला आहे.शेवटच्या टप्प्यामध्ये सुमारे ७ कोटी ५८ लक्ष रुपयांचा निधी मिळाल्याने उर्वरित कामे होणार आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर झाल्याने येत्या दोन महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती श्री.धनवटे व श्री छाजेड यांनी दिली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!