जिल्ह्यात गुटखा विक्री पुन्हा जोमात;बंदी असतानाही कोणाच्या आशीर्वादाने होतेय विक्री-मुथा

श्रीरामपूर-जिल्ह्यात गुटखा विक्रीला बंदी घालण्यात होती.माञ आता गुटखा विक्री बंदी झुगारुन गुटखा विक्री पूर्ववत सुरु झाली आहे.या गुटखा विक्रीला कोणाचा तरी...

श्रीरामपूर-
जिल्ह्यात गुटखा विक्रीला बंदी घालण्यात होती.माञ आता गुटखा विक्री बंदी झुगारुन गुटखा विक्री पूर्ववत सुरु झाली आहे.या गुटखा विक्रीला कोणाचा तरी आशिर्वाद आहे.त्यामुळे नेमकी कोणाच्या आशीर्वादाने गुटखा विक्री सुरु आहे, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते सुनिल मुथा यांनी केला आहे.
श्री.मुथा म्हणाले की,राज्यात विशिष्ट यंञणेला हाताशी धरुन अनधिकृत गुटखा विक्री होते.यात गुटखा विक्रेते व संबंधित यंञणा यांच्यात मोठी ‘अर्थ’पूर्ण देवाणघेवाण होते.या पध्दतीने होणा-या गुटखा विक्रिला ‘सिस्टिम गुटखा’ म्हणून ओळखले जाते.जिल्ह्यात अशा पध्दतीने अनधिकृत गुटखा विक्री सुरु होती. माञ एका वृध्दाने पोलिस अधिक्षकांसमोर गुटख्यामुळे झालेल्या बरबादीची व खेड्यापाड्यातील व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीच्या व्यथा सांगितलेल्यनंतर जिल्ह्यात अनधिकृत गुटखा विक्रीला चाप लावण्यात आला.काही ठिकाणी अनधिकृत गुटखा विक्री करणारांवर पोलिसांकडून कारवाई देखिल करण्यात आली.या कारवाईचे जनतेने स्वागतही केले होते असे श्री.मुथा म्हणाले.काही महिने बंद असलेली  गुटखा विक्री पुन्हा राजरोसपणे सुरु झाली आहे. बंद असलेली गुटखा विक्री पूर्ववत सुरु झाल्याने गुटखा बंदीची ऐसी की तैसी झाली आहे.गुटखा बंदी झुगारुन गुटखा विक्री पुन्हा सुरु झाली आहे ती शासन यंञणेचे आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही.त्यामुळे बंद असलेली सिस्टीम गुटखा विक्रीला नेमके कोणाचे आशिर्वाद आहेत,काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने गुटखा विक्री जोरात सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यावर कारवाई करतील काय अशी विचारणा श्री.मुथा यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!