मनसे पूर्ण ताकदीने निवडणुका लढवणार-जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

श्रीरामपूर- श्रीरामपूर येथील मनसेच्या कार्यालय येथे नुकतीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी येणाऱ्या...

श्रीरामपूर-   
श्रीरामपूर येथील मनसेच्या कार्यालय येथे नुकतीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची ठेवायची आहे.स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाने युतीचा प्रस्ताव देऊन सन्मानपूर्वक जागा दिल्या तर राज ठाकरे व इतर वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.परंतु युती होऊ अगर ना होऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढवून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपल्या पक्षाची ताकत दाखवण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तन मन धनाने काम करावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना केले.

या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हा सचिव संजय नवथर, मनसे तालुका अध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहर अध्यक्ष सतिश कुदळे या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इथून असणाऱ्या उमेदवारांची मते जाणून घेऊन निवडणुकी संदर्भात चर्चा केली .
या बैठकीत प्रसंगी भास्कर सरोदे तालुका सचिव, महेश सोनी शहर सचिव, विलास पाटणी तालुका संघटक, निलेश सोनवणे शहर संघटक, विठ्ठल ठोंबरे तालुका उपाध्यक्ष, मारूती शिंदे शहर उपाध्यक्ष, सोमनाथ पवार, संदीप विश्वंभर, प्रवीण कारले सचिन कदम,राजू जगताप, प्रसाद पऱ्हे, किशोर भागवत, दीपक सोनवणे, मच्छिंद्र हिंगमिरे, सुजित गायकवाड, संतोष धुमाळ, सुरज जोशी, अमोल वडीतके, बाळासाहेब ढाकणे, किरण वानखेडे, सुनील करपे, फिरोज सय्यद, सरताज सय्यद, सौरभ निर्मळ किशोर शिंदे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!