जिल्हाधिकाऱ्यांनी आत्मीयतेने ऐकल्या जेष्ठांच्या समस्या; जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक

श्रीरामपुर-जिल्हाधिकारी पंकज अशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये जेष्ठ नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकारी यांनी...

श्रीरामपुर-
जिल्हाधिकारी पंकज अशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये जेष्ठ नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकारी यांनी आत्मीयतेने ऐकून घेतल्या. तसेच यावेळी काही मागण्याही करण्यात आल्या.महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघटना अहिल्यानगर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण कार्यालय यांची दि. ९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली.यात जेष्ठ नागरिक संघटनेसाठी अहिल्यानगर व शिर्डी येथे विरंगुळा केंद्र जागेसह इमारत बांधून द्यावी. जेष्ठासाठी ५००० हजार रुपये मानधन  सरसकट द्यावे. मुख्यमत्री तिर्थदर्शन योजना पुन्हा चालु करावी. पंतप्रधान वयोवंदना ५ लाखापर्यतचे वैद्यकीय उपचार मोफत कार्ड, शासनामार्फत काढून मिळावे.जेष्ठ नागरिकाचे डोल व इतर योजनेचे थकित पैसे देणी दिपावलीपूर्वी खात्यात रक्कम जमा करावी,जेष्ठाना ग्रामपंचायतपासुन ते मंत्रालयापर्यंत,शासकीय कार्यालय, धार्मिक ठिकाणी,मंत्रीभेटी अदि ठिकाणी अग्रक्रमाने प्राध्यान्य मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या.अनेक सरकारी योजनाबद्दल जिल्हाधिकारी अशीया व समाज कल्याणचे कोरनटीवार यांच्याबरोबर सकारत्मक चर्चा झाली.यावेळी सर्व जेष्ठ नागरिकांच्या वतीने संघटनेचे उपाध्यक्ष वसंतराव मुठे यांनी जिल्हाधिकारी अशीया व इतर अधिकरी यांचा सत्कार केला.यावेळी शब्बीरभाई पठाण, नुर शेख,दरेकर,ज्ञानेश्वर चौधरी,आगरकर,युनुस पठाण, काझीभाई, हीराबाई गोरखे यासह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

जेष्ठ नागरिकांच्या वतीने संघटनेचे उपाध्यक्ष वसंतराव मुठे यांनी जिल्हाधिकारी अशीया यांचा सत्कार केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!