श्रीरामपूरातील मेडिकलवर पोलिसांची धाड;नशेच्या इंजेक्शनसह 31 हजारांचा मुद्देमाल जप्त;औषध विक्रेता गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत पुन्हा अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या नशेच्या इंजेक्शसह मेडिकलच्या मालकास ताब्यात घेतले आहे.या इंजेक्शनच्या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत पुन्हा अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या नशेच्या इंजेक्शसह मेडिकलच्या मालकास ताब्यात घेतले आहे.या इंजेक्शनच्या बाटल्या विकणाऱ्या मेडिकलवर धाड टाकत 31,370 रुपये किंमतीच्या नशेच्या इंजेक्शन व बाटल्या पोलिसांच्या पथकाने जप्त केल्या आहेत.या कारवाईत मेडिकलचा मालक पंकज राजकुमार चव्हाण वय 21, रा. खंडाळा,ता.श्रीरामपूर याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील खंडाळा परिसरात असणाऱ्या एका मेडिकलवर छापा टाकण्यात आला.कारवाईपूर्वी पथकाने औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना सोबत घेतले. तपासणी दरम्यान पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला मेडिकल मध्ये पाठवले होते. त्याला नशेच्या बाटल्या विकत असतानाच पथकाने मेडिकलचा मालक पंकज चव्हाण याला ताब्यात घेतले.त्यानंतर पथकाने मेडिकल आणि घराची झडती घेऊन 31,370 किंमतीच्या नशेचा साठा आणि रोख रक्कम जप्त केली आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ.रमीझ राजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 914/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125, 278 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोउपनि दिपक मेढे,अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके,रिचर्ड गायकवाड, सुनिल मालणकर,रमीझराज आतार,चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेडिकल मालकाला ताब्यात घेतले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!