श्रीरामपूरात भाजपसाठी योगदान नसलेल्यांनाच महत्व;जलसंपदा मंत्री महाजन यांच्याकडे शिष्टमंडळाने व्यक्त केली खदखद

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यात भाजप पक्षासाठी काम करणाऱ्यांपेक्षा पक्षाला कोणतेही योगदान नसलेल्या व्यक्तींना महत्त्व दिले जात आहे.तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्यावर सातत्याने अन्याय...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यात भाजप पक्षासाठी काम करणाऱ्यांपेक्षा पक्षाला कोणतेही योगदान नसलेल्या व्यक्तींना महत्त्व दिले जात आहे.तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे.त्यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक  
आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढवणार आहोत,अशी भूमिका श्रीरामपूर येथील भाजपच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडली.मुंबई येथे सेवासदन बंगल्यावर भाजप मधील विविध कार्यकर्त्यांसमवेत प्रकाश चित्ते यांनी ना.गिरीश महाजन यांची भेट घेतली.यावेळी चर्चेनंतर ना.गिरीश महाजन यांनी ‘काळजी करू नका, सर्व ठीक होईल’ असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती चित्ते यांनी दिली.याप्रसंगी भाजप नेते सुनील मुथ्या, माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, माजी तालुकाध्यक्ष बबन मुठे, सुरेश आसने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीवेळी झालेल्या चर्चेत श्रीरामपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षासाठी गेली 35 वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही झटत काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदापासून, जिल्हाध्यक्षपदापर्यंत अगदी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदापर्यंतही चित्ते यांना अन्याय सहन करावा लागत आहे,असे यावेळी शिष्टमंडळाने ना. महाजन यांना सांगितले. याशिवाय, महाराष्ट्रात विधानसभेच्या वेळी पक्षाच्या विरोधात उमेदवारी  केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई न होता. श्रीरामपूर तालुक्यात भाजपचा उमेदवार नसतानाही केवळ नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या सांगण्यावरून प्रकाश चित्ते यांना पक्षातून काढण्यात आले.तसेच अलीकडेच श्रीरामपूरमध्ये काँग्रेसमधील दहा नगरसेवकांना पक्षात घेतले गेले आहे. त्यांना नगराध्यक्षपदाचा शब्द देण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!