इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथून दोन तरुण शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी लोणी परिसरामध्ये गेले होते.तेथे त्यांनी एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथून दोन तरुण शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी लोणी परिसरामध्ये गेले होते.तेथे त्यांनी एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूर वरून लोणी येथे कॉलेजला आलेल्या मुलींची टिंगलटवाळी करण्यासाठी आल्याबाबत परस्परांशी बोलत असल्याचे दिसून येत आहे.त्यांचा उद्देश हा केवळ मुलींची छेड काढणे हा असल्याचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ वरून दिसून आल्यावर पोलिसांनी या दोघेही तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे.शाहिद हुसेन शेख, वय 21 वर्षे रा.श्रीरामपूर,सात हशम सय्यद, वय 20, राहणार वार्ड नंबर 1  श्रीरामपूर  अशी दोघांची नावे आहेत.या दोघा आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करून  गुन्हा रजिस्टर नंबर 548/2025 कलम भारतीय न्याय संहिता 62, 79 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112,117अन्वये गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी पोलीस निरीक्षक वाघ हे करत आहे.दोघेही आरोपींचे  मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.दोघेही आरोपींनी आपल्या बेकायदेशीर वर्तनाची माफी देखील मागितल्या बाबतचा त्यांचा व्हिडिओही प्रसारित केला आहे.पोलीस विभागाकडून सोशल मीडिया अर्थात फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यावर प्रसारित होणाऱ्या विविध पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून जर कोणी अशा प्रकारे गैरवर्तन करून आपत्तीजनक  पोस्ट प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करत आहेत. महिला, मुली यांच्याशी संबंधित गैरप्रकार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल.शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीनी असे कोणाकडूनही गैरप्रकार किंवा गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. जेणेकरून अश्या गैरवर्तन करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल,असे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!