अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मदत संजीवनी ठरेल-भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बांद्रे

श्रीरामपूर-राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटींच्या मदतिचे पॅकेज जाहीर केले.वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे.आजपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीसाठी...

श्रीरामपूर-
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटींच्या मदतिचे पॅकेज जाहीर केले.वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे.आजपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीसाठी एवढी मोठी भरीव मदत यापूर्वी कधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजाला उभारी मिळाली आहे. ही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरेल, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बांद्रे यांनी केले आहे.
बांद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,
केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे बळीराजाच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक राहिलेले आहे.राज्यात दि.13 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. खरीप हंगामातील सोयाबीन,कपाशी,मका तूर, उडीद व इतर कापणीसाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी हवालदील झाला. कुणाची पिके वाहीली तर कुणाची जनावरे मृत्युमुखी पडली. कुणाची घरी पडली तर कुणाची शेतीत खरडून वाहून गेली. काहींच्या विहिरींची पडझड झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लोणी येथील दौऱ्यात खुद्द शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  व उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे महायुती सरकारने भरीव मदत जाहीर केली.तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला पद्मश्री डॉ.विखे साखर कारखान्याच्यावतीनेही एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्याबद्दलही भाजप किसान मोर्चाच्या वतीने बांद्रे यांनी आभार मानले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!