आ.ओगले यांनी ‘फुकटचं श्रेय’ घेऊ नये-त्रिभुवन;सर्वपक्षीय आंदोलनांमुळे श्रीरामपूर-मुंबई बस सुरू

श्रीरामपूर-गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर आज (६ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे...

श्रीरामपूर-
गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर आज (६ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे गेली सहा महिन्यापासून सर्वपक्षीय आंदोलनाचा पाठपुरावा असून, हे यश आंदोलनकर्त्यांचं आहे. मात्र, या बस सुरू होण्याचे श्रेय आमदार हेमंत ओगले यांनी घ्यायचा केलेला प्रयत्न “फुकटचा आणि केविलवाणा” असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे.सहा महिन्याच्या संघर्षानंतर यश श्रीरामपूर-मुंबई बस गेली सहा वर्षे बंद होती. ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन, निवेदने आणि पाठपुरावा केला. शेवटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत पंधरा दिवसापूर्वी लेखी आश्वासन दिलं आणि बस सुरू झाली. यामध्ये आमदार हेमंत ओगले यांचा कोणताही सहभाग नव्हता. साधे दोन ओळीचे पत्र देखील दिले नाही परंतु गाडी सुरू होणार हे कळताच आमदार ओगले आणि त्यांचे काही कार्यकर्ते अचानक प्रकट झाले आणि नारळ फोडून फोटोसेशन करून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपवर, ही बस त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याचे खोटे संदेश पसरवण्यात आले. हे जनतेची दिशाभूल करणारे असून अशा खोट्या श्रेय लाटण्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांना श्रेय घ्यायच असेल तर रोज सकाळी आठ वाजता श्रीरामपूर मुंबई बस चालू होती ती बस कोरोना काळापासून बंद केली आहे ती गाडी पुन्हा सुरू करून दाखवावे आणि त्याचे श्रेय आ.ओगलेंनी घ्यावे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू असेही त्रिभुवन यांनी स्पष्ट केले.श्रीरामपूर आगाराला मिळालेल्या १० नवीन एसटी बसबाबतही स्पष्टीकरण देताना मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये म्हणाले,की गाड्या आमदार ओगले यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या नाहीत.तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक आगाराला न मागता १० बस देण्यात आल्या आहेत. अजूनही दोन टप्प्यांत प्रत्येकी ५ अशा १० बस येणार आहेत.कारण जुन्या अनेक गाड्या स्क्रॅप करण्यात आल्या आहेत.
माजी नगरसेवक मुख्तार शहा यांनीही हेमंत ओगले यांच्यावर टीका करताना म्हणाले, “जर यापुढे आमदारांनी अशाप्रकारे खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर तो प्रकार खपवून घेतला जाणार नाही.”आम्ही आंदोलन करून मिळवलेलं यश कुणी हायजॅक करणार असेल, तर त्याचा निषेध होणारच. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल म्हणाले की मतदारसंघात अनेक कामे प्रलंबित आहेत त्या कामाकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावे. सुभाष त्रिभुवन यांनी केलेले कामात ढवळाढवळ करू नये अन्यथा रिपाई स्टाईलने उत्तर दिले जाईल.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, गुरुनानक मार्केटचे बिट्टू शेठ बत्रा, बन्सीलाल फेरवानी, संदीप पवार, रोशन बात्रा, दीपक माखिजा, अहमद शहा आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!