श्रीरामपूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले;सर्वपक्षीय इच्छुकांच्या आशा पल्लवित

श्रीरामपूर-राज्यात कुठल्याही क्षणी नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू झालेली असून आज राज्यातील नगरपंचायती आणि नगर...

श्रीरामपूर-
राज्यात कुठल्याही क्षणी नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू झालेली असून आज राज्यातील  नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षण सोडतीही जाहीर करण्यात आल्या आहेत.यापूर्वीच प्रभागरचना जाहीर करण्यात आल्या होत्या.आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असल्याने निवडणूकीची रणधुमाळी सुरू होईल. आज मुंबई येथे जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचेही आरक्षणही जाहीर झाले आहे. 2006 नंतर यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे.सर्वसाधारण गटासाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने श्रीरामपूर शहरातील सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे चित्र आहे.थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार असल्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची आणि रंगतदार ठरणार आहे.महायुती आणि महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रच लढतील अशी चर्चा सुरू असली तरी ऐनवेळी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे ‘आपण आपले तयारीत राहिलेले बरे’ असाच काहीसा सर्व प्रमुख इच्छुकांचा होरा दिसून येत आहे.त्यामुळे सर्वांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.आतापर्यंत तरी महायुती व महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याच्या अनुषंगानेच तयारी केलेली दिसत आहे. तसा दावा वेळोवेळी वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. परंतु अद्याप याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
दरम्यान श्रीरामपूरात नगराध्यक्षपदासाठी अनेक पक्षाचे दिग्गज इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. यात मा. नगराध्यक्षा अनुराधा अदिक,मा. नगराध्यक्ष संजय फंड, मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा. उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी,मा. उपनगराध्यक्ष अंजूम शेख,भाजपचे प्रकाश चित्ते,शिवसेनेचे सागर बेग,राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक कानडे यांच्यासह अनेक इच्छुकांची नावे सध्या चर्चेत आहेत.मा. आ. भानुदास मुरकुटे यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.मागील नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याची संधी स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांना शहरातील मतदारांनी दिली होती.यावेळच्या निवडणुकीत मात्र परिस्थिती बरीच वेगळी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत मतविभागणीमुळे काँग्रेसचे आ.हेमंत ओगले हे विजयी झाले असले तरी श्रीरामपूरात हिंदुत्ववादी मतांचा वाढलेला टक्का,राज्यात आणि केंद्रात असलेली भाजपप्रणित सत्ता,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहर व तालुक्यात केलेली विकासकामे,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली ताकदीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.स्व.जयंतराव ससाणे यांना मानणारा शहरातील मतदार आणि काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक, शिवसेना ठाकरे गटाची ताकद नगराध्यक्षपदाच्या निवडणूकित निर्णायक ठरणार आहेत.या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील जनता कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकते आणि नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होण्याची संधी कुणाला देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!