मुठेवाडगाव-माळवाडगावला लवकरच पूर्ण दाबाने विज;नामदर विखे पाटील यांनी दिले आदेश

श्रीरामपूर-मुठेवाडगाव,माळवाडगाव व खानापुर येथील शेती व घरघुती ग्राहकांना भोकर सबस्टेशन येथून कायम कमी दाबाने वीज पुरवठा होत होता.त्यामुळे सदर प्रश्न भाजपाचे...

श्रीरामपूर-
मुठेवाडगाव,माळवाडगाव व खानापुर येथील शेती व घरघुती ग्राहकांना भोकर सबस्टेशन येथून कायम कमी दाबाने वीज पुरवठा होत होता.त्यामुळे सदर प्रश्न भाजपाचे जेष्ठ नेते गिरिधर आसने व सरचिटणीस डॉ.शंकरराव मुठे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडला. त्याचा सातत्याने पाठपुरवठा  केल्याने आता पुढील दोन महिन्यात मुठेवाडगाव माळवाडगावला पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार आहे.  भोकर ते खानापुर तसेच हरेगाव ते माळवाडगाव येथे नविन पोल उभे करण्याचे काम चालू होते परंतु सदर कामाला विलम्ब होत होता.त्यामुळे श्रीरामपुर येथे झालेल्या आढावा बैठकी मध्ये डॉ. मुठे यांनी नामदार विखे पाटील यांच्याकडे  याबाबद काही प्रश्न उपस्थित केले. यात सकाळी पाहटे ५ वाजता लाईट बंद करने, नविन लाईनचे पोल टाकणे बाबद ठेकेदारचा मनमानी कारभार यांचा समावेश होता. त्याबद्द्ल विखे पाटील यांनी  महवितरणचे भांगाळे यांना सूचना केल्या.प्रत्यक्ष गावात पाहणी करुन ज्या काही समस्या आहे त्याची तातडीने सोडवणुक करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे  इंजिनियर केदारी,भोकर सबस्टेशन अधिकारी मुळे,हरेगाव सबस्टेशनचे गोसावी व वायरमन यांनी  पाहणी केली.मुठेवाडगाव येथील मावलयाचा मळा पर्यन्त ८ते ९ डीपी (ट्रान्सफार्मर) यांचा वीज पुरवठा तात्काळ हरेगाववरून जोडून दयावा व लाईनचे काम लगेच चालू करुन काही प्रमाणात भोकर सबस्टेशनचा लोड कमी करावा. तसेच सकाळचे लोडसिडिंग बंद करण्याच्या सुचना दिल्या. तसेच बीसीनाला येथील मुठेवाडगाव व माळवाडगाव पाणी पुरवठा योजना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही सूचना केल्या. यावेळी गिरधर आसने, डॉ.शंकर मुठे, शिवाजी मुठे,तात्यासाहेब चौधरी, गोकुळ मुठे, साईनाथ मुठे,सोपान द्वारकानाथ मुठे,जय मुठे, वेताळ आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!