श्रीरामपूरात पुन्हा थरार;नाऊरच्या दोन तरुणांवर चॉपरने वार;संतप्त ग्रामस्थांनी दोन दुचाकी गाड्या पेटवून देत दोघांना पकडले

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर चौफुली परिसरात महाविद्यालयीन तरुणांच्या दोन टोळक्यांत सिनेस्टाईलतुफान राडा झाला.या हाणामरीच्या घटनेत चॉपरसारख्या धारदार हत्याराचा वापर करण्यात आला असून...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर चौफुली परिसरात महाविद्यालयीन तरुणांच्या दोन टोळक्यांत सिनेस्टाईल
तुफान राडा झाला.या हाणामरीच्या घटनेत चॉपरसारख्या धारदार हत्याराचा वापर करण्यात आला असून संतप्त जमावाने दोन दुचाकी जाळून टाकल्यानेही खळबळ उडाली आहे.जुन्या वादाच्या संदर्भातुन या महाविद्यालयीन तरुणांमध्ये ही हाणामारीची घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.श्रीरामपूर येथील अज्ञात आठ ते नऊ महाविद्यालयीन तरूणांनी हरेगावमार्गे पाठलाग करत येऊन नाऊर चौफुली जवळ नाऊर येथील तरुणांच्या चालू गाडीवर एकाच्या पाठीवर आणि दुसऱ्याच्या तरुणाच्या डोळ्याजवळ व डोक्यावर चॉपर सारख्या हत्याराने वार करत गंभीर जखमी केले.भरदिवसा घडलेल्या या थराराने श्रीरामपूर तालुक्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.या मारहाणीमध्ये महेश संजय शिंदे (वय २२ ) व शिवम जालिंदर शिंदे (वय २०) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.श्रीरामपूर वरून येऊन परिसरातील मुलांना मारहाण सुरू असलेली पाहून नाऊर ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी रोष व्यक्त करत श्रीरामपूर वरून आलेल्या आरोपींच्या दोन दुचाकी जाळून टाकल्या व दोघांना पकडुन ठेवले. या तरुणांच्या बरोबरचे काही जण मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.याबाबत सविस्तर माहिती अशी की,श्रीरामपूर शहरात नाऊर येथील तरुणांच्या दुचाकीला दुसऱ्या टोळक्यातील एकाने कट मारल्याची घटना घडली. यावेळी नाऊर येथील तरुणांनी कट मारणाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वाद विकोपाला गेला आणि श्रीरामपूर येथील तरुणांनी काही मित्रांना फोन करून त्या ठिकाणी बोलवले. तोपर्यंत नाऊरच्या तरुणांनी तेथून आपली दुचाकी भरधाव वेगाने शहराबाहेर काढली. दुसऱ्या टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला.पाठलाग करत करत श्रीरामपूर येथील हे टोळके थेट नाऊर चौफुलीपर्यंत येऊन पोहचले.त्यांनी नाऊर चौफुली जवळ चालू गाडीवरच महेश संजय शिंदे व शिवम जालिंदर शिंदे यांच्यावर वार केला.यात एकाच्या पाठीवर आणि दुसऱ्याच्या तरुणाच्या डोळ्याजवळ व डोक्यावर चॉपर सारख्या हत्याराने वार करण्यात आल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर हरेगाव फाट्याजवळील जिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना साखर कामगार रुग्णालय येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.या घटनेने नाऊर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले. त्यांनी पाठलाग करत आलेल्या तरुणांच्या दुचाकी जाळून टाकल्या.घटनेतील सर्व तरुण महाविद्यालयीन असल्याची माहिती मिळाली आहे.महाविद्यालयिन तरुणांच्या या दोन टोळोक्यांत हा राडा झाल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने तालुकाभर पसरली होती.

संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिलेल्या दुचाकी.
जखमी तरुण
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!