शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार भरपाई द्या;आ.ओगले यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

श्रीरामपुर-बळीराजा कधी नव्हे एवढा अडचणीत सापडला असून सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत आहे. तरी सरकारने तातडीने ओला दुष्काळ...

श्रीरामपुर-
बळीराजा कधी नव्हे एवढा अडचणीत सापडला असून सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत आहे. तरी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५०हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती आ. ओगले यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेती व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टी मध्ये कपाशी सोयाबीन,मका,कांदा,भाजीपाला, फळबागा व जनावरांच्या घास पिकाचे देखील नुकसान झाले आहे. तसेच नदी व ओढ्याच्या लगतची शेती खरडून गेली असून सौर कृषी पंप देखील वाहून गेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील प्रकाश खपके या तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व आधी घेतलेल्या पीक कर्जाचा धसका घेऊन आत्महत्या केली आहे. अशी भयावह परिस्थिती सध्या संपूर्ण मतदारसंघात आहे.सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून सरसकट पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी जेणेकरून अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला हातभार लागेल. शेती व पीक मालाची हानी मोठी आहे तरी आपण तातडीने याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात आणि लवकरात लवकर संपुर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.

सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५०हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!