श्रीरामपूर तालुक्यात ५०० कुणबी नोंदी सापडल्या;दाखले मिळणे होणार सोयीचे

श्रीरामपूर-तालुक्यात जन्म-मृत्यू नोंदी, सरकारी शाळा आणि इतर शासकीय कार्यालय मिळून सुमारे ७५०० कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत.त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाजातील नागरिकांना...

श्रीरामपूर-
तालुक्यात जन्म-मृत्यू नोंदी, सरकारी शाळा आणि इतर शासकीय कार्यालय मिळून सुमारे ७५०० कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत.त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाजातील नागरिकांना रीतसर शासकीय नोंदी उपलब्ध असल्यामुळे कुणबी दाखले मिळण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे मत प्रमाणित मोडी लिपी वाचक ॲड.शुभम शामराव फरगडे यांनी व्यक्त केले आहे.अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कुणबी दाखला,जात पडताळणी व हैदराबाद गॅझेट,सातारा गॅझेट संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन करताना ॲड,फरगडे यांनी  सांगितले. यावेळी त्यांचे सहकारी मयूर पांडागळे व ललित आरगडे उपस्थित होते. यावेळी माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले की,पूर्वीच्या काळात श्रीरामपूर तालुका अस्तित्वात नसल्याने सध्या श्रीरामपूर मध्ये असणाऱ्या बहुतेक गावातील व्यक्तींच्या नोंदी या नेवासा,राहुरी व कोपरगाव तालुका दुय्यम निबंधक कार्यालयात सापडलेल्या आहेत.तसेच आपल्या हिंदू धर्मातील परंपरेनुसार बहुतेक मुलांचे जन्म हे त्याकाळात मामाचे गावी झालेले आहेत.त्यामुळे तालुक्यातील काही व्यक्तींच्या नोंदी परगावात जन्म झाल्यामुळे इतर तालुक्यातील गावांमध्ये सापडतात.
यासर्व नोंदींचे योग्य वर्गीकरण आणि एकत्रीकरण केल्यास तालुक्यातील बहुतांश बांधवांना कुणबी दाखले मिळतील आणि त्याची कायदेशीर पडताळणी देखील होईल असे सांगितले.ॲड,शुभम फरगडे म्हणाले की,सुदैवाने आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील असंख्य नोंदी सापडलेल्या आहेत.परंतु सुमारे १२५ वर्षे उलटून गेल्यामुळे हा कागद जीर्ण होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे भविष्याचे दृष्टीने या नोंदींचे योग्य जतन होणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक गावातील बांधवांनी एकत्र येऊन सदर जुन्या जीर्ण झालेल्या नोंदीचे लॅमिनेशन करणे गरजेचे आहे.गेल्या दोन वर्षामध्ये कुणबी दाखल्याचे आधारे आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळाल्याने त्यांना शिक्षण घेणे शक्य झाले असून यापुढे देखील हा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार होणार असल्याचे सांगितले.त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटचा पूर्वी मराठवाड्यात असलेल्या म्हंकाळवाडगाव,भामाठाण, सरला,गोवर्धन या गावांना फायदा होणार आहे.तसेच आकारी पडीत शेतकऱ्यांच्या नऊ गावातील शासकीय नोंदी सापडलेल्या असल्याने त्यांनाही कुणबी दाखले मिळण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीरामपूर तालुक्यातील कुणबी दाखले काढताना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोणतीही अडवणूक न करता रीतसर नोंदी असलेले दाखले काढण्यास चांगले सहकार्य लाभत असल्याचेही ॲड,फरगडे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी उंदीरगाव,बेलापूर बुद्रुक,भैरवनाथनगर,मातापुर या गावातील बांधवांनी जीर्ण झालेल्या नोंदीचे लॅमिनेशन स्वखर्चाने करून देण्याची जबाबदारी घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश कांगुणे यांनी केले तर स्वागत अमोल बोंबले,पाहुण्यांचा परिचय सुधाकर बोंबले व आभार ऋषिकेश मोरगे यांनी मानले.यावेळी नागेशभाई सावंत व राजेंद्र मोरगे यांनी अखंड मराठा समाज श्रीरामपूरने आजपर्यंत केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासह इतर सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
त्याचबरोबर समाजासाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांना सर्वांचा मोठा सहभाग असणे गरजेचे असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
ॲड,बाळासाहेब आगे म्हणाले की,आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने अखंड मराठा समाजाने विविध सामाजिक उपक्रम राबवून जमा खर्च प्रसिद्ध करून पारदर्शक कार्य केले आहे.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब डावखर, शिवाजीराव भोसले,प्रवीण
फरगडे,निलेश जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी रोहन डावखर, विशाल धनवटे,गोकुळ गायकवाड,सचिन बोंबले,शामराव फरगडे,सचिन जगताप,बद्रीनाथ उंडे,अनिल भनगडे,सुभाष फरगडे,रवींद्र कांबळे,मच्छिंद्र आव्हाड,पोपटराव फरगडे,दिनकर यादव,डॉ.विश्वास वहाडणे, रमेश आव्हाड,कुणाल बनकर,दिपक डावखर,रमेश कालंगडे,रवींद्र कांबळे,संदीप बनसोडे,बाबासाहेब थोरात, फकिरचंद चौधरी,प्रसाद हुरे, राजेश धुमाळ,शिवाजी ताके, ज्ञानदेव सुसरे,स्वप्निल जाधव,नंदकुमार चौधरी,प्रमोद लोहकणे, कृष्णा मोरगे,भाऊसाहेब निपुंगे,दिपकराव गाडे,रमेश बेलकर,बाळासाहेब घोडे, बापूसाहेब बनकर,रावसाहेब मुळे,सुनील कराळे,लक्ष्मण ढोकळे,दत्तात्रय मोरगे, चंद्रकांत दरंदले,विपुल ताके यांच्यासह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!