प्रकाश चित्ते यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट;ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या सर्वंकष चौकशीची मागणी

श्रीरामपूर-प्रकाश चित्ते यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संपूर्ण घटनाक्रमाची सखोल आणि सर्वंकष चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाचे...

श्रीरामपूर-
प्रकाश चित्ते यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संपूर्ण घटनाक्रमाची सखोल आणि सर्वंकष चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाचे नेते सुनील मुथा यांच्यासह प्रकाश चित्ते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या भेटीत चित्ते व मुथा यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले की, संबंधित फिर्यादीने प्रथम रात्री पावणेआठ वाजता दिलेल्या एनसीमध्ये जातीयवाचक शब्दांचा उल्लेख नव्हता. मात्र, रात्री एक वाजता दाखल झालेल्या दुसऱ्या फिर्यादीत आठ-दहा दिवसांपूर्वीच्या काल्पनिक घटनांचा उल्लेख करून जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या विसंगतींवर कोणतीही शहानिशा न करता तातडीने ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रकाश चित्ते म्हणाले की, ही कारवाई राजकीय द्वेषातून आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली झाली आहे. मी श्रीरामपूरमध्ये तसेच नगर जिल्ह्यातील सत्ताधारी असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळे मला थांबविण्यासाठी आणि माझे राजकीय आयुष्य संपविण्यासाठीच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात फिर्यादीतील घटनेप्रमाणे कोणतीही घटना घडलेली नाही.”प्रकरणाची वस्तुनिष्ठ व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी केली.

प्रकाश चित्ते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!