आ.हेमंत ओगले पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

श्रीरामपूर-अतिवृष्टीच्या या अस्मानी संकटात तुम्ही एकटे नसून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, असा धीर आमदार हेमंत ओगले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट...

श्रीरामपूर-
अतिवृष्टीच्या या अस्मानी संकटात तुम्ही एकटे नसून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, असा धीर आमदार हेमंत ओगले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर जाऊन दिला.गेल्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला या पावसात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले सदर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष बांधावर जात आ.ओगले यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले व पदाधिकारी उपस्थित होते.करण ससाणे म्हणाले की, अतिवृष्टी होताच आ. ओगले यांनी तातडीने सरसकट पंचनामा करण्याचे आदेश सरकारी यंत्रणेला दिले असून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे कमी आ.ओगले प्रयत्नशील असल्याचे म्हटले.सचिन गुजर म्हणाले की, शेतकरी चहूबाजूंनी अडचणी सापडला आहे आता तोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत असल्याने बळीराजा हवालदिल झाला असल्याचे सांगितले.बाबासाहेब दिघे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची की तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.डॉ. मुरकुटे म्हणाल्या की, निसर्गाचा लहरीपणा, कवडीमोल बाजारभाव अशा दुहेरी संकटात शेतकरी असून येणाऱ्या काळात बळीराजाला साथ देणे महत्त्वाचे आहे.

आमदार हेमंत ओगले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!