लाभार्थ्यांसह अधिकाऱ्यांसाठी ‘डीबीटी’ ठरतेय डोकेदुखी; दिव्यांग,निराधार,एकल महिलांना पैसे मिळेनात

श्रीरामपूर-विविध योजनांचा लाभ तात्काळ लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी सुरू केलेली थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) प्रणाली सध्या लाभार्थी व अधिकाऱ्यांची...

श्रीरामपूर-
विविध योजनांचा लाभ तात्काळ लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी सुरू केलेली थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) प्रणाली सध्या लाभार्थी व अधिकाऱ्यांची डोकेदुखी बनली आहे. आधार सिडिंग करूनही तांत्रिक अडचणींमुळे संजय गांधी निराधार योजनेसह इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभार्थी अनेक महिने लाभापासून वंचित असल्याची तक्रार मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे व अपंग सामाजिक कल्याण व पुनवर्सन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी केली आहे.
त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रारी करून त्यांचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र सरकारने जानेवारी- फेब्रुवारी २०२५ पासून विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांचे मासिक अनुदान डी.बी.टी. द्वारे आधार सीडिंग असलेल्या बँक खात्यात वर्ग करण्याची घोषणा केली. तथापि गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अनेक दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा, परित्यक्ता, अनाथ यांचे पोस्ट, बँक खाते आधार सीडिंग असून देखील त्यांच्या लाभार्थ्यांचे बँक खात्यात अनुदान जमा होत नाही. अनेकांना काही महिने लाभ मिळून, तो पुन्हा बंद झाला. याबाबत तहसीलमध्ये चौकशी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयास ईमेल केला आहे, असे सांगितले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केला असता मुंबईला कळविले आहे, असे सांगितले जाते. डी.बी.टी.चे काम पाहणाऱ्या मुंबईतील समन्वयकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे अडचणींचे निराकरण होत नसल्याने जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी तसेच लाभार्थ्यांसाठी नवी डी.बी.टी. प्रणाली लाभदायक होण्याऐवजी तापदायक बनली आहे. अशा वंचित लाभार्थ्यांची संख्या एकटया श्रीरामपूर तालुक्यात पाचशेहून अधिक तर अहिल्यानगर जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक असल्याचे समजते.
बहुतांश दिव्यांग व वयोवृद्ध हे शारीरिक अडचणीमुळे एकाच जागी असल्यामुळे ते आधार अपडेट व बँक सीडिंगसाठी जाऊ शकत नसल्याने त्यांचे अनुदान बंद झालेले आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मानधनाअभावी दैनंदिन वैद्यकीय खर्च, उपजीविकेचा खर्च भागविणे जिकरीचे झाल्याने गेल्या आठ महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत जगत आहेत. शासनाच्या वतीने देण्यात येणारे मानधनच निराधारांचा एकमेव आधार आहे.
स्थानिक महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर याबाबत पूर्णतः उदासीन असल्याचे स्पष्ट दिसत आहे. केवळ औपचारिकता म्हणून डीबीटी एजन्सीकडे चौकशी करण्यात येऊन असमाधानकारक उत्तरे दिली जात आहेत. आमच्या हातात काही नाही, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र अनुदान नेमकं कोणत्या कारणामुळे बंद झाले, याची अचूक माहिती देत नाहीत. अनेकांना तर एकाच स्वरुपाची उत्तरे दिली जातात. मानधन जमा होत नसल्याने दिव्यांग, निराधार, एकल महिला लाभार्थी हवालदिल झाले आहेत.  
आपणास विनंती आहे की, कृपया अशा लाभार्थ्यांचे थकीत मानधन तत्काळ जमा होण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे. तथापि अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित असून देखील वितरित होत असलेल्या शासनाच्या रकमेवरून ही बाब उघड होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र असे आढळून न आल्याने वितरित होत असलेल्या रक्कमेची चौकशी होणे गरजेचे आहे.
डीबीटी प्रणाली द्वारे वितरित करण्यात येणाऱ्या मानधनाची सखोल चौकशी होऊन सर्व लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ सुरळीतपणे मिळावा, अशी मागणी मिलिंदकुमार साळवे व लक्ष्मण खडके यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!