भारतमातेच्या सुपुत्राचा धर्मगुरूंच्या हस्ते गौरव;विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा सन्मान

श्रीरामपूर-ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणारे आणि भारत सरकारकडून शौर्यपदक प्राप्त करणारे श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा भव्य सत्कार सर्व...

श्रीरामपूर-
ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणारे आणि भारत सरकारकडून शौर्यपदक प्राप्त करणारे श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा भव्य सत्कार सर्व जाती-धर्मांच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत करण्यात आला. हा आगळावेगळा सत्कार शासकीय विश्रामगृह, श्रीरामपूर येथे सायंकाळी ५ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष कवी सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या पुढाकाराने पार पडला.
या कार्यक्रमात शीख, बौद्ध, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ब्रह्मकुमारी, महानुभाव आदी धर्मांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक धर्मगुरू उपस्थित होते. शीख धर्मगुरू आलोक सिंग मस्किन, बौद्ध धर्मगुरू भंते मोगलयान, हिंदू धर्मगुरू प्रभू दयाल शर्मा, मुस्लिम धर्मगुरू अकबरअली काझी, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्ह. फादर संजय थोरात, ब्रह्मकुमारी बी.के. मंदादीदी, महानुभावपंथ धर्मगुरू हंसराज पंजाबी बाबा, जयेशमनी पंजाबी ह. भ. प. तुकाराम महाराज कदम, ह. भ. प. संतोष महाराज पटारे, बौद्धाचार्य अण्णासाहेब झीने, आणि अण्णासाहेब शरणांगते यांच्या हस्ते देवेंद्र औताडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व धर्मगुरूंनी त्यांना आशीर्वाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित असलेल्या विंग कमांडर देवेंद्र औताडे म्हणाले,माझे अनेक सत्कार झाले, पुढे होतील ही पण हा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. सर्व धर्मगुरूंनी दिलेला आशीर्वाद आणि प्रेम मला प्रेरणा देणारे आहे. आमचा खरा दुश्मन कोणत्याही जाती-धर्माचा नाही, तर जो कोणी भारताकडे वाईट नजरेने पाहील – मग तो पाकिस्तान असो, चीन असो, की अन्य देश – अशा शत्रूंना संपवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
कार्यक्रमाचे संयोजक कवी सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले,ऑपरेशन सिंदूर कडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. विंग कमांडर औताडे यांनी शत्रूच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक मुक्तारभाई शहा, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, परशुराम आदिक, आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी दिलीप औताडे, तसेच कवी बाबासाहेब पवार, राहुल शहाणे, बिट्टूशेठ बत्रा, शाहरुख मन्सुरी, वणेश कुवर, सुनील दंडवते, प्रभाकर गायकवाड, अमोल मिसाळ, नंदकिशोर लबडे, शरीफ शेख, असिफ मणियार, वैशाली पालकर शाहिद बागवान, रितेश पालकर, तय्यब पठाण, विशाल थोरात, अल्ताफ अत्तार, कृष्णा शर्मा, शाहरुख बागवान, अक्षय छाजेड, जुबेर कुरेशी आदींची उपस्थिती होती.

भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा  सर्व जाती-धर्मांच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!