श्रीरामपूर (प्रतिनिधी) : बेलापूर येथील उर्दू शाळेजवळ गोमांस विक्रीसाठी वापरले जात असलेले वादग्रस्त शेड अखेर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात हटवले आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून गोमांस विक्री होत असल्याचे उघडकीस आणले होते.
या प्रकरणानंतर गावातील विविध हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी संघटना आणि समाज संघटनांनी शेड हटवण्याची मागणी ग्रामपंचायत, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन तसेच तहसीलदार श्रीरामपूर यांच्याकडे केली होती. परवाना नसल्याने बेकरी तात्काळ तीन दिवसांत बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मागील कारवाई च्या वेळी पोलिसांनी संबंधित इसमाकडुन सुमारे ७५ किलो मांस जप्त केले होते. हे मांस गोमांस आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
या कारवाईच्या वेळी मा. जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच सौ. मीनाताई साळवे, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुधीर हापसे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.