श्रीरामापूरमधील हार्दिक उपक्रमाबद्दल वाचा, जिथे संत तुळशीराम महाराज पडाई दिंडीतील ९०० भाविकांना पंढरपूरच्या यात्रेदरम्यान पावसाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट देण्यात आले.
श्रीरामपूर (प्रतिनिधी):
पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुळशीराम महाराज पायी दिंडी मुठेवाडगाव, कारेगाव व टाकळीभान येथील अनेक भाविक वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पावसाच्या त्रासापासून संरक्षण मिळावे यासाठी मिरजगाव येथे एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत सुमारे ९०० भाविकांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, पुणे येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अविनाशजी कुलकर्णी, श्रीरामपूर मार्केट कमिटीचे संचालक गिरधर आसने आणि भाजप तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
“मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या विचारातून हे रेनकोट वाटप करण्यात आले असून, पावसाळी हवामानात वारकऱ्यांना चालताना त्रास होऊ नये, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे डॉ. मुठे यांनी सांगितले.
या प्रसंगी अनेक दिंड्यांना सदिच्छा भेटी देण्यात आल्या व सर्व भाविकांचे स्वागत सन्मानपूर्वक करण्यात आले.
कार्यक्रमावेळी श्रीराम संघाचे रामेश्वर मुठे, मारुती जासूद, प्रदीप मुठे, जालिंदर मुठे, साईनाथ मुठे, ओम मुठे, वेदांत मुठे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकारचे सामाजिक उपक्रम वारकरी संप्रदायाला बळ देणारे असून, भाविकांच्या सेवेसाठी समाजातील पुढाकार घेणाऱ्या लोकांचे कौतुक सर्वत्र होत आहे.