बेलापूर व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता, येथील पोलिस दूरक्षेत्राच्या जागी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-बेलापूर येथे सध्या पोलिस दूरक्षेत्र असून गावाची लोकसंख्या, विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र तसेच हद्दीत वाढत्या गुन्हांची संख्या लक्षात घेता बेलापूर येथे नविन पोलिस स्टेशन कार्यान्वित करावे, अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचेकडे करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी नुकतीच श्रीरामपूरला भेट दिली. त्याप्रसंगी बेलापूर, ऐनतपूर, बेलापूर खुर्द, नर्सरी, वळदगाव, उंबरगाव, एकलहेरे, पढेगाव, उक्कलगाव या गावांचा समावेश होऊन बेलापूर बुद्रूक येथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई, अॅड. अरविंद साळवी, महेश कुहे, अभिषेक नवले आ आदी उपस्थित होते. बेलापूर पोलिस दूरक्षेत्र हे सध्या श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला संलग्न आहे. येथे पोलिस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल अशी पदे आहेत. बेलापूर-ऐनतपूर गावाचा विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र लक्षात घेता पुरेसे कर्मचारी पोलिस स्टेशन असणे गरजेचे आहे याकडे निवेदनाव्दारे घार्गे यांचे लक्ष वेधण्यात आले.
“पोलीस कर्मचारी व संसाधनांची कमतरता लक्षात घेता, बेलापूरसारख्या वाढत्या गावासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची गरज आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Tags: #BelapurNews #PoliceStationDemand #ShrirampurLive
Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह