कलाकारांच्या मदतीसाठी सदैव कटिबध्द-आमदार ओगले यांची ग्वाही

श्रीरामपूर-सलग दुसऱ्या वर्षी बाल कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य गौरी गणेश चित्रकला स्पर्धा भरवून आपण दिलेला शब्द पाळला आहे. पालकांचेही मोठे...

श्रीरामपूर-
सलग दुसऱ्या वर्षी बाल कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य गौरी गणेश चित्रकला स्पर्धा भरवून आपण दिलेला शब्द पाळला आहे. पालकांचेही मोठे कौतुक वाटते की, त्यांनी पाल्यांमधील कलाकार ओळखून प्रोत्साहित केले. यापुढील काळातही आपण मतदार संघातील कलाकारांच्या मदतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार हेमंत ओगले यांनी दिली
साई सोशल फाऊंडेशन, तुळजा फाऊंडेशन व रंगलहरी आर्ट ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच भव्य गौरी गणेश चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार ओगले बोलत होते. मंचावर माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्येष्ठ चित्रकार भरतकुमार उदावंत, रंगलहरी आर्ट ॲकॅडमीचे संचालक चित्रकार रवी भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष  अण्णासाहेब डावखर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, रितेश रोटे आदी उपस्थित होते.
ससाणे म्हणाले, मुलांवर कलात्मक संस्कारकरण्यासाठी पुढील वर्षी पालकांनी त्यांच्यासोबत स्पर्धेत सहभाग घ्यावा. तरच येणारी पिढी ही संवेदनशील घडेल व उज्जवल भारत निर्माण होण्यास मदत होईल.
   सचिन गुजर म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या माध्यमातून वाव मिळतो अतिशय सुंदर चित्र मुलांनी काढले अशा प्रकारच्या स्पर्धा घेणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले.चित्रकला स्पर्धेत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेते अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतिय व उत्तेजनार्थ दोन पुढीलप्रमाणे. खुला गट- अदित्य गुंड, उदयराज नवघने, सतिश जाधव, वेदांत भांबारे, पायल पाठक, गौरव थोरात, स्नेहल चव्हान, मोठा गट- श्रूतिका रंधे, सायली साळुंखे, अपूर्वा नांदूरकर, पुजा नागरे, गौरी भागवत. मध्यम गट- सोहम नवले, सोहम नाईक, मानसी सुरूडे, ओंकार कापुरे, सर्वेश बागडे. लहान गट- सिद्धांत आढाव, वेदश्री व्यास, आज्ञा चौधरी, माऊली लांडगे, मानस महाले. या व्यतिरिक्त ५० स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

साई सोशल फाऊंडेशन, तुळजा फाऊंडेशन व रंगलहरी आर्ट ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच गौरी गणेश चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!