बस स्टॅंड व स्वच्छतागृहासाठी रास्तारोकोचा इशारा;प्रवाशी,महीला व विद्यार्थ्यांची कुचंबणा

श्रीरामपूर-टाकळीभान हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे व परीसरातील खेड्यांचे दळणवळण येथुनच होत आसल्याने या ठिकाणी बस थांब्यासाठी बसस्टॅंड आवश्यक आहे. मात्र...

श्रीरामपूर-
टाकळीभान हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे व परीसरातील खेड्यांचे दळणवळण येथुनच होत आसल्याने  या ठिकाणी बस थांब्यासाठी बसस्टॅंड आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी बस स्टॅंडच नसल्याने प्रवाशांना, महीलांना व विद्यार्थी विद्यार्थ्रिनींना उन, वारा, पावसात रस्त्याच्या कडेलाच ताटकळत उभे राहावे लागते.त्यामुळे येथील तरूणांनी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे बस स्टॅंड व सुलभ शौचालय बांधण्याबाबतचे निवेदन दिले असून यात रास्तारोकोचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात  नमूद केले आहे की, टाकळीभान हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावातून तसेच पंचक्रोशीतील अनेक गावातून ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी शिक्षण, नोकरी तसेच इतर दैनंदीन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात. स्टॅंडवर आल्यानंतर बस येईपर्यंत या प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना बस स्टॅंड नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी बस स्टॅंड होते. मात्र रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली हे बस स्टॅंड रस्ता रुंदिकरणाला आडथळा ठरत नसतानाही पाडले गेले आहे. तसेच या ठिकाणी बस स्टॅंड साठी निधी मंजुर आहे. माञ निधी मंजूर असतानाही अधिकार्‍यांच्या चालढकलीमुळे ते होवू शकले नाही.  
टाकळीभानचा परिसर विस्तीर्ण असल्याने गावातील लोकसंख्या व विद्यार्थी संख्या प्रचंड वाढलेली आहे. रस्त्याच्या दुर्तफा हे विद्यार्थी बसची वाट पाहत उभे असतात. महिला व विद्यार्थीनींची यावेळी प्रचंड हेळसांड होत आहे. तरी सा. बां. विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी बस स्टॅंड व सुलभ शौचालय बांधावे, अन्यथा टाकळीभानचे संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर काकासाहेब कोकणे, सचिन माने, विकास पटारे, साईनाथ खंडागळे, भाऊसाहेब पवार, बद्रीनाथ पटारे आदींच्या सह्या आहे.

टाकळीभान येथील तरुणांनी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे बस स्टॅंड व सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याबाबतचे निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!