‘त्यांच्या’ घरावर बुलडोझर फिरवा- त्रिभुवनशौचालयाचा मैला पिण्याच्या पाईपलाईनमध्ये सोडणाऱ्यांविरोधात निदर्शने

9 shrirampur nagarparishad

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-
पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयचा मैला सोडणाऱ्या समाजकंटाकावर कडक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावे पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी तसेच रामभरोसे असलेल्या तलावाला वीस फुटाची संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी सीसी कॅमेरे लावण्यात यावे तसेच तलावाला २४ तास वॉचमनचा पहारा देण्यात यावा या मागणीसाठी १ जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषदेवर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली.

त्यावेळी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना रिपाईच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे नेते संजय छल्लारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले.त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की शासनाच्या निधीतून नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून  गोंधवणी या ठिकाणी  श्रीरामपूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु तेच पाणी सुरक्षित राहिले नाही कारण गेली सात आठ वर्षापासून मिल्लतनगर या ठिकाणी राहणाऱ्या  लोकांकडून शौचालयाचे मैलामिश्रित पाणी पिण्यास मिळाले. हा अत्यंत भयंकर व गंभीर गुन्हा असून माणुसकीला काळीमा फासणारा हा  प्रकार आहे. म्हणून त्या समाजकंटकाच्या घरावर बुलडोझर फिरवा अशी मागणी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे. संजय  छल्लारे म्हणाले की साठवण तलावात जाणाऱ्या पिण्याच्या  पाईपच्या लाईन  वरील अतिक्रमण त्वरित काढण्यात  यावे अन्यथा नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन छेडू. तसेच राजेंद्र सोनवणे म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या पाण्याने आपले देव देवता धुवून मनोभावाने पूजाच्या करतात तेच पाणी जर शौचालयाचा मैला मिश्रित आहे ज्यांनी हे कृत्य केलं त्याला माफी देता कामा नाही.  अभिजीत लिपटे म्हणाले की नगरपालिकेने श्रीरामपूर शहरातील गोरगरिबाच्या टपऱ्या काढून त्यांना देशोधडीला लावले तशी त्वरित वरील अतिक्रमण काढण्यासाठी वापरावी यावेळी भैय्या भिसे सागर कुदळे रमादेवी धीवर मुक्तार शहा रियाज पठाण रुपेश हरकल बाली बेलदार आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी राम शिंदे लखन वायकर किशोर ठोकळ सुरेंद्र पानपाटील संघराज त्रिभुवन राहुल लुक्कड विजय जाधव सुनील कासार राहुल शहाणे शाहरुख मन्सुरी रवी चव्हाण आप्पासाहेब गाडेकर अनिल इंगळे सिद्धांत गायकवाड रोहित नाईक प्रकाश कोळेकर सुनील दंडवते श्रीराम निकम गोरख शिवदे उज्वला येवलेकर कारभारी त्रिभुवन दीपक माखीजा गणेश पालकर आदी  उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे यांनी केले आभार अभिजीत लिपटे यांनी मानले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News