आ.चव्हाण संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व; ना.विखे पाटील यांचे गौरवोद्गार चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल सन्मान

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली...

pradeshadyaksh

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्ष अधिक मजबुतीने काम करून मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.


भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


आ. रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिका-यां मध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले.


आ. रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. कल्याण डोंबीवली महानगर पालिका आणि डोबिवली विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी विजयाची घोडदौड सुरु केली. सलग चार वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व ते करीत आहेत. सार्वजनिक जीवनात विकास कामांच्या प्रक्रीयेला पुढे जाण्याचा मोठा अनुभव तसेच एक कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राहीलेली संघटनात्मक वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.


महायुती सरकारमध्ये विविध मंत्री पदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नागरी हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्राधान्याने राज्यातील रस्ते विकासामध्ये त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहीले. सरकार आणि संघटना यातील योग्य समन्वय साधण्याचा अनुभव आ. रविंद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याने राज्यात भाजपाच्या संघटनात्मक कामाला त्यांचे बहुमोल असे मार्गदर्शन निश्चित उपयुक्त ठरेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य करीत असलेल्या विकासात्मक वाटचालीला संघटनेच्या माध्यमातून भक्कम असे पाठबळ उभे करून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही विधानसभे प्रमाणेच भारतीय जनता पक्ष प्रथम स्थानावर यश मिळवेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!