श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;खासदारकी पणाला लावू-खा.वाकचौरे

श्रीरामपूर-श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिली. त्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी दिली. त्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या तीन वर्षापासून या रेल्वे मार्गाला मंजुरीपासून वंचित ठेवून या भागावर अन्यायचं केला आहे. 104 वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संसदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली.
खा. वाकचौरे यांनी संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, 104 वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला ब्रिटिशांनी मंजुरी देऊन भूमी अधिग्रहण करत माती भरावाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल जून 2022 मध्ये मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. हे सर्व असूनही केवळ आरओआर चे कारण देत गेल्या तीन वर्षापासून या रेल्वे मार्गाला मंजुरी पासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले तसेच या रेल्वे मार्गापेक्षा दुप्पट तोट्यात असलेल्या रेल्वे मार्गाला सरकारने मंजुरी देत अशा रेल्वे मार्गाचे काम सुरू आहेत याकडे खासदार वाकचौरे यांनी लक्ष वेधले श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासन हे 50 टक्के खर्च करण्यास तयार असल्याचेही केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून दिले आहे या सर्व गोष्टी पूरक असूनही केवळ केंद्राच्या मंजुरीमुळे हा रेल्वे मार्ग प्रलंबित असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले तसेच या रेल्वे मार्गामुळे जागतिक तीर्थक्षेत्र असलेले शिर्डी व तिरुपती बालाजी या तीर्थक्षेत्रातील अंतर 550 किलोमीटरने कमी होणार आहे  तसेच या रेल्वे मार्गावर दहा ते पंधरा साखर कारखाने असल्याने रेल्वेला मालवाहतुकीतून जास्तीचे उत्पन्न मिळणार आहे या रेल्वे मार्गाला प्रलंबित ठेवल्यामुळे या मार्गावरील तालुके दोन जिल्हे यांचा विकास खुंटलेला असल्याचेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे या सर्व बाबींचा विचार करता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाबाबत सकारात्मकता दाखवली आहे या मार्गाच्या निवेदनाच्या प्रती रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्ना व रवणीत सिंह यांना देण्यात आले आहे

माझी खासदारकी पणाला लावील
श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्गावर कशाप्रकारे अन्याय केला जात आहे हे रेल्वेमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी आणि हा रेल्वे मार्ग पूर्णतःवास लावण्यासाठी मी माझी खासदारकी पणाला लावील-खासदार भाऊसाहेब वाकचौरे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!