जलसंपदा मंत्री विखे पाटील मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी;मराठा समाजाच्या प्रश्नांचा आढावा घेणार

श्रीरामपूर-मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्यसरकारने मंत्रीमंडळाची उपसमिती पुनर्गठीत केली असून या...

श्रीरामपूर-
मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्यसरकारने मंत्रीमंडळाची उपसमिती पुनर्गठीत केली असून या समितीच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आजपर्यंत यशस्वीपणे केलेल्या कार्यवाहीला पुढे घेवून जाण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.बारा सदस्यांच्या या समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, क्रिडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे.मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय व वैधानिक कामकाजाचा संबंध ठेवणे, या संदर्भातील न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समूपदेशींशी समन्वय ठेवणे, न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणी बाबतची कार्यपद्धती ठरविणे, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीशी समन्वय ठेवून त्यांच्या कामकाजातील अडचणींचे निवारण करणे, मराठा आंदोलक व त्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करणे, जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेवून प्रक्रीया सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करणे, मराठा समाजासाठी घोषीत केलेल्या योजना तसेच सारथी व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबणीचा आढावा घेण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!