श्रीरामपूर-
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे.मनोवृत्ती बदल झाला तरच खर्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज१७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनातून “कृष्णा वेध येली विरहिणी बोले” ह्या संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगातील कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी स्त्री, गोपी चंद्राला पाहून म्हणते की, “हे चंद्रा, तू माझ्या अंगाला उबारा देत आहेस, पण मला चंदन लावू नकोस, वाराही घालू नकोस. कारण कृष्णाशिवाय मला काहीही चांगले वाटत नाही.”
या अभंगात, विरहिणी स्त्री कृष्णाच्या विरहाने किती दुःखी आहे, तिची व्याकुळता, आणि कृष्णाशिवाय तिला कशातच आनंद मिळत नाही हे विरहान रचनेतून महाराजांनी स्पष्ट केले आहे. रचनेचे विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की, आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले. अध्यात्मात आल्यास भजन – किर्तन नाही आले तरी चालेल परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही. अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल अशा दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकत असल्याचे महाराज म्हणाले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,या भागातील सरला बेटाचा विकास करण्यासाठी १०९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात येईल. तसेच देवगाव शनि येथील उच्च पातळी बंधाऱ्याची मागणीही पूर्ण करु, तसेच या सोहळ्याला दरवर्षी येईन असेही आश्वासन त्यांनी दिले.यावेळी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,नामदार राधाकृष्ण विखे पाटील,सुदशन चनलचे सुरेश चव्हाणके आमदार रमेश पा बोरणारे,आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,दिनेशभाऊ परदेशी,आविनाश पा गंलाडे डॉ प्रकाश शेळके सावदा आश्रमाचे मंहत कृष्णगिरी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्या सह लाखो भाविकांनी बुंदी व चिवडाचा महाप्रसाद
घेतला.
