बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले...

श्रीरामपूर-
अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. नगर तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बनावट चलनी नोटांचे रॅकेट उघडकीस आणत मोठी कारवाई केली. 27 जुलै 2025 रोजी आंबीलवाडी शिवारात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह फिरणाऱ्या निखील शिवाजी गांगर्डे (वय 27, रा. कुंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ माणिक शिंदे (वय 25, रा. तपोवन रोड) यांना महिंद्रा थार गाडीतून ताब्यात घेतले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे.

सपोनि प्रल्हाद गिते यांनी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की, दोन संशयित काळ्या महिंद्रा थारमधून बनावट नोटा घेऊन आंबीलवाडी शिवारात सिगारेट खरेदी करत आहेत. पथकाने तात्काळ सापळा रचून निखील गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त झाल्या.पुढील तपासात बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून प्रदिप संजय कापरे (वय 28, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार), मंगेश पंढरी शिरसाठ (वय 40, रा. शिवाजी नगर), विनोद दामोधर अरबट (वय 53, रा. सातारा परिसर), आकाश प्रकाश बनसोडे (वय 27, रा. निसर्ग कॉलनी), अनिल सुधाकर पवार (वय 34, रा. मुकुंदनगर) आणि अंबादास रामभाऊ ससाणे (रा. टाकळी, ता. शेवगाव, फरार) यांचा सहभाग निष्पन्न झाला.पोलिसांनी 59 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा, 2 लाख 16 हजर रुपयांचे कागद आणि शाई, तसेच 27 लाख 90 हजार 600 रुपयांचे मशीन, संगणक आदी साहित्य जप्त केले. एकूण 88 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईत सपोनि प्रल्हाद गिते, पोसई भरत धुमाळ, पोहेकॉ सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांढेकर, खंडू शिंदे, सागर मिसाळ, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग आणि मोहिनी कर्डक यांचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!