श्रीरामपूर-
आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळही येऊ देणार नाही,असा इशाराच बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ यांनी दिला आहे.
शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे बैठकीत सक्त आदेश दिला होता.त्या आदेशाच्या अनुषंगाने आज दिनांक 31 जुलै रोजी बारा वाजता वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोटे उपाधीक्षक भुमिअभिलेख रवींद्र खरोटे नगर अभियंता सूर्यकांत गवळी अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागेची स्थळ पाहणी करण्यासाठी येत असता आमदार हेमंत ओगले यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलून घेतले.त्यानंतर त्यांना आमदार ओगलेनी त्यांच्या सरकारी गाडीतून उतरून आंबेडकरी जनतेला देखावा करण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसून डॉ.आंबेडकर पुतळ्याकडे घेऊन आले. तिथे अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करू न देता व्हिडिओ शूटिंग तसेच फोटोसेशन करून माध्यमांना बाईट देऊन जणू काही आपणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परवानगीसाठी पुढाकार घेत आहोत असा देखावा करण्याचा प्रयत्न करून निघून गेले. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ या झालेल्या प्रकारामुळे आमदार हेमंत ओगलेंचा तीव्र निषेध केला.त्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा दोन तासाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन स्थळपाहणी करून जागा निर्वाणीकरण झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे सुपूर्त केला आहे.त्यामुळे जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला. त्याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती बसवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचे युद्धपातळीवरून काम चालू असून यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लक्ष घालून त्यांचे स्वीय सहाय्यक अंजाबापू गोल्हार, पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी गेली सात-आठ महिन्यापासून अनेक अडचणी दूर करून पुतळ्याच्या जागेचे काम प्रगतीपथावर आणले आहे.यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास बिहानी, संतोष मोकळ, चरण त्रिभुवन, दादासाहेब बनकर, संजय रूपटक्के, अमोल काळे, बाळासाहेब हिवराळे, विशाल सुरडकर, भाऊसाहेब खरात, दत्ता खेमनर, भैय्या भिसे,संजय गांगड, सतीश सौदागर,बंडू शिंदे, संजय बोरगे आदी उपस्थित होते.

यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास बिहानी आदी.