आंदोलकांनी अनुभवला खाकी वर्दीतला देवदूत;पोलीस कॉन्स्टेबलने वाचवले आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे प्राण

पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आज एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता होती.नेहमी आंदोलने,मोर्चे आणि घोषणांनी घेरलेल्या नगरपालिकेसमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी एका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याने आपल्याच देहाची ‘होळी’ करण्याचा निर्धार केलेला होता. त्यामुळे वातावरण गंभीर आणि तितकेच चिंतेचे होते. आंदोलक घोषणा देत होते,कार्यकर्त्यांच्या भावनांचा कल्लोळ उसळलेला होता. याच ताणतणावाच्या गर्दीत एक पोलीस कॉन्स्टेबल आपल्या समयसूचकतेने ‘त्या’ आत्मदहन करणाऱ्या कार्यकर्त्याचा जीव वाचवतो अन आपसूकच उपस्थितांना खाकीतला देवदूत त्याच्यात दिसून जातो.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,आंबेडकर चळवळीतील मनोज काळे हे डॉ.बाबासाहेबांचे पूर्णाकृती स्मारकासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाला निवेदने देत आहेत. तरी देखील न्याय मिळत नसल्याने, आपल्या मागणीसाठी आज त्यांनी अखेर नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा मार्ग निवडला.आंदोलन सुरू असताना श्रीरामपूर नागरपरिषदेच्या मागच्या बाजूने जेव्हा ते स्वतःला आगीच्या हवाली करण्याच्या प्रयत्नात होते, तेव्हा एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्क नजरने त्यांना हेरले. ती सतर्क नजर होती श्रीरामपूर शहर ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे यांची.आज त्यांची साप्ताहिक सुट्टी होती तरी आपल्या कर्तव्याप्रती असलेली जबाबदारीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही.अखेर त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या काळे यांच्यावर
क्षणार्धात झडप घातली आणि त्यांना घट्ट जखडून ठेवले. एका क्षणासाठी सारे वातावरण स्तब्ध झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह समाधान सोळंके, आजीनाथ आंधळे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मिरा सरग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.आंदोलक काळे यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले गेले.पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे यांनी तत्परता आणि सतर्कता दाखवून अघटित घटना घडण्यापासून थांबवली. त्यांच्या समयसूचक कृतीमुळे मनोज काळे यांचे प्राण वाचले. म्हणूनच ते आज केवळ पोलीस दलाचेच नव्हे, तर संपूर्ण श्रीरामपूर शहराचे हीरो ठरले आहेत.खाकी वर्दीतल्या देवदूताला सलाम!

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News