श्रीरामपूर:
बारामती, इंदापूर या पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या तालुक्यांमध्ये हिंदुत्व जागवण्याचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्ताने बारामती येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती कार्यक्रम बारामती नगरपरिषदे समोरील शारदा प्रांगणात मोठ्या थाटात संपन्न झाला. बारामती, भिगवण आणि इंदापूर तालुक्यातून असंख्य धनगर समाज बांधव याप्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण धर्मरक्षक सागर बेग यांना करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची सुबक मूर्ती देऊन सागर बेग यांना यावेळी गौरवण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण झाले. तर इतर नियोजित कार्यक्रमामुळे जत विधानसभेचे आमदार व धनगर समाजाचा बुलंद आवाज गोपीचंद पडळकर यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.कार्यक्रम यशस्वितेसाठी बारामती सकल हिंदू समाज व धनगर बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले तर दौंड विधानाभमतदारसंघाचे आमदार राहुल कुल, पुणे कॉन्टोमेंट विधानसभा आमदार सुनील कांबळे, विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर, माळशिरसचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे राहाता तालुकाध्यक्ष मदन आप्पा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.